vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कोजागिरी पोर्णिमानिमित्तअंबड हद्दीतील वाहतुक मार्गात बदल..

कोजागिरी पोर्णिमानिमित्तअंबड हद्दीतील वाहतुक मार्गात बदल..

 

प्रदेश प्रतिनिधी : जालना जिल्ह्यातील अंबड येथे दि. 16 ऑक्टोबर, रोजी कोजागिरी पोर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते. त्याअनुषंगाने अंबड हद्दीतील मत्सोदरी देवी मंदीर येथे कोजागिरी पोर्णिमेच्या दिवशी दर्शनी यात्रा भरुन मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते. मंदीरात दर्शन घेण्याकरीता मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. अवजड वाहनांच्या रहदारीमुळे क्षुल्लक बाबीवरुन विवादीत परिस्थिती निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याअनुषंगाने भाविकांच्या व जनतेच्या सुरक्षिततेसाठी व वाहतुकीच्या सुनियमानासाठी सदर मार्गावरील अवजड वाहनांना पर्यायी मार्गाने वळविण्यात येत आहे.

 

पोलीस अधिक्षक अजय कुमार बन्सल यांना प्राप्त अधिकारान्वये त्यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 ची कलम 36 अन्वये, जालनाकडे येणारी अवजड वाहनांना दि. 15 ऑक्टोबर, 2024 रोजी 23.00 वाजता ते दि. 16 ऑक्टोबर, 2024 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत खालील नमुद पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेशीत केले आहे.

 

यात बीडकडून अंबडमार्गे जालनाकडे येणारी अवजड वाहने ही (शहागड, हरीओम हॉटेल वडीगोद्रीसमोरील उड्डाणपुलाचे खालुन, पाचोड, अंबड, गोलापांगरीमार्गे जालनाकडे जातील.) तसेच जालनाकडुन अंबडमार्गे बीडकडे जाणारी अवजड वाहने ही याच पर्यायी मार्गाचा अवलंब करतील.

 

तसेच घनसावंगीकडुन अंबडमार्गे जालनाकडे जाणारी अवजड वाहने ही (सुतगिरीणी चौफूली घनसावंगी, गुरुपिंपरी, राणीउंचेगाव, राणीउंचेगाव फाटा, अंबड येथील महालक्ष्मी पेट्रोल पंप समोरुन, गोलापांगरी मार्गे जालनाकडे जातील.) जालनाकडून अंबडमार्गे घनसावंगीकडे जाणारी अवजड वाहने ही याच पर्यायी मार्गाचा अवलंब करतील.

 

तर घनसावंगीकडून अंबडमार्गे शहागडकडे जाणारी अवजड वाहने ही (सुतगिरणी चौफुली घनसावंगी, तिर्थपुरी, सुखापुरी, सुखापुरी फाटा, वडीगोद्री, यामार्गे शहागडकडे जातील.) शहागडकडून अंबडमार्गे घनसावंगीकडे जाणारी वाहने ही याच पर्यायी मार्गाचा अवलंब करतील.

 

वरील मार्गाचे अवजड वाहतूकीमध्ये दि. 15 ऑक्टोबर, 2024 रोजी 23.00 वाजता ते दि. 16 ऑक्टोबर, 2024 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत बदल करण्यात आला असून सर्व वाहन धारकांनी याची नोंद घ्यावी असे पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकारी यांची कुलभैय्या अनाथालयास भेट देवून पाहणी …

मुंबई मध्ये गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर 1, 4, 5, 6, 9 सप्टेंबर दिवशी बंद असतील ‘हे’ रस्ते; जाणून घ्या पर्यायी मार्ग!.

vishwatmaklokswamivarta

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024-विधानसभा मतदानाच्या टक्केवारीत जालना जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर· 2019 च्या तुलनेत 2024 मध्ये 5.6 टक्‌यांनी मतदानात वाढ…

vishwatmaklokswamivarta

भयातून विकासाकडे गडचिरोलीची वाटचाल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढील दहा वर्षांत महाराष्ट्रातील पहिल्या पाच जिल्ह्यांत गडचिरोली असेल

vishwatmaklokswamivarta

विधानसभा कामकाज लक्षवेधी:तामदर्डी येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना- मंत्री संजय राठोड…

vishwatmaklokswamivarta

पुणे पोलिसांच्या श्वान पथकातील श्वानांचे अनोखे नामकरण, ‘अशी’ ठेवली नावे…

vishwatmaklokswamivarta