vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

धारावी पोलिसांचे मनोबल वाढविण्यासाठी सदिच्छा भेट…

धारावी पोलिसांचे मनोबल वाढविण्यासाठी सदिच्छा भेट…

 

मुंबई प्रतिनिधी:

ऑक्टोबर महिन्यातील रमजान ई द पाठोपाठ गणपती, त्यानंतर नवरात्र उत्सव शांततेने व सुरक्षित पार पाडल्याबद्दल व ध्वनी प्रदूषण गर्दीवरील नियंत्रण यापासून नागरिकांना सुटका मिळाल्याबद्दल तसेच धारावी कलानगर येथे तृतीयपंथी करीत असलेल्या व्यवसायावर पोलिसांनी नजर ठेवून योग्य ती कारवाई केल्याबद्दल आणि भविष्यातही धारावीत सर्वसाधारण नागरिक,जेष्ठ नागरिक सुरक्षित रहावे याकरिता व पोलिसाचे मनोबल वाढविण्यासाठी दिनांक 17 नोव्हेंबर 2024 सायंकाळी सहा वाजता धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्री राजू बिडकर साहेब व उपनिरीक्षक श्री संजय कोळी यांची प्रत्यक्ष सदिच्छा भेट घेऊन त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक करण्यासाठी धारावी नागरिक समिती, झोपडपट्टी पोलीस पंचायत व हॅपिनेस ज्येष्ठ नागरिक संघ यांचे प्राथमिक शिस्त मंडळातील प्रतिनिधी अलका साबळे, गिरीश शेरखाने,गोविंद भोईटे,अशोक काळे,सविता शेरखाने आणि सामाजिक कार्यकर्ते दिलीप गाडेकर यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन शाल श्रीफळ व फुलगुच्छ देऊन अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. त्याचवेळी आभार अभिनंदन व शुभेच्छांचे लेखी पत्र पोलीस बंधूंना देऊन आभार मानले. यापुढेही असे जोमाने काम करून समाजात विश्वास निर्माण होईल,धारावी एकसंघ राहील याकरिता आपण सर्व प्रयत्न करूया.

संबंधित पोस्ट

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले अपघातातील मृत्युमुखींच्या कुटुंबियांचे सांत्वन 

मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी जनजागृती, प्रशिक्षण आणि तपासणी प्रभावीपणे राबवा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

चंदनवाडी शिवसेना शाखेच्या वतीने 10 वी 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न

नृत्यांगना गौतमी पाटीलवर मरगळे कुटुंबीयांचा गंभीर आरोप, कारने रिक्षाला धडक दिल्यानंतर चौकशी तर सोडाच पण…

इंद्रायणी नदी वरील पूल कोसळून झालेली घटना दुर्दैवी आणि वेदनादायी — उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई होणार 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल