लैगिंक अत्याचारप्रकरणी आरोपी फरार ? मुंब्रा पोलीस निष्क्रिय असल्याचा-पिडिती चा आरोप,दोषी अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याची मागणी..
सुरेश गायकवाड मुंबई प्रतिनिधी:
मुंबई- मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत लैगिंक अत्याचार केल्याच्या घटनेप्रकरणी संशयित इसमास अद्यापही अटक करण्यात आली नाही त्याच्या निषेधार्थ पिडितीने मुंबई मराठी संघात आयोजित केलेल्या दि.21 ऑक्टोबर २०२४ रोजी पत्रकार परिषदेत सदर संशयित व्यक्तीस अटक करून यासंबंधी हलगर्जीपणा केलेल्या दोषी अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याची मागणी केली आहे .
यावेळेस पिडितीने सांगितले की , सदरची घटना ही दि.24 ऑक्टोंबर २०२४ रोजी असून तीचा गुन्हा रजि. क्रमांक 1811 /2024 असा दाखल आहे. सदर दाखल गुन्हया प्रकरणी संबंधित इसमास पोलीसांनी अटक न केल्याने त्यांनी पोलीस प्रशासनाविषयी संताप व्यक्त केला आहे . कारण सदर व्यक्ती हॉस्पिटलला ॲडमिट असल्याचे दाखवून तेथून ती पसार झाली असल्याचे त्यांनी सांगितले .
तरी संबंधित प्रकरणी सदर व्यक्तीवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असूनही त्या व्यक्तीस अटक होत नसल्याने या प्रकरणी मुख्यमंत्री गृहमंत्री आणि पोलीस प्रशासनाने गांभीर्याने दरवल घ्यावी असे त्यांनी सांगितले .