vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

भिवंडीत संशयित वाहनाची भरारी पथक व पोलिसांकडून तपासणी,विनातपशील आढळलेला ३ लाख ३१ हजार ६०९ रुपयांचा मुद्देमाल जप्त.

भिवंडीत संशयित वाहनाची भरारी पथक व पोलिसांकडून तपासणी,विनातपशील आढळलेला ३ लाख ३१ हजार ६०९ रुपयांचा मुद्देमाल जप्त.

 

भिवंडी प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. १३६ भिवंडी पश्चिम येथे भरारी पथक व नारपोली पोलीस यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत संशयित वाहनांमध्ये रू. ३ लाख ३१ हजार ६०९/- चा मुद्देमाल विनातपशील आढळला असून ज्यात चांदी व चांदीचे काम असलेल्या वस्तूंची बिले तपासणीदरम्यान सादर न केल्याने भरारी पथकामार्फत धडक कारवाई करीत हा मुद्देमाल जप्त केला आहे, याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 

१३६ भिवंडी पश्चिमचे भरारी पथक क्र. ७ व नारपोली पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत पहाटे ३ वाजता एक संशयित वाहन ताब्यात घेण्यात आले. या वाहनामध्ये असलेल्या सामानाबाबत पोलिसांनी चौकशी केली असता वाहनचालक व गाडीतील इतर कर्मचाऱ्याना सामानाबाबत कोणतीही माहिती देता न आल्याने पोलिसांनी ही गाडी नारपोली पोलीस ठाण्यात आणली. पोलीस व भरारी पथकातील कर्मचाऱ्यांनी गाडीतील साहित्य कुरिअर एजन्सीच्या मालक व पंचासमक्ष गाड़ी तुन खाली उतरावला. संशयित वाहनातून एकंदर ७३ छोटे मोठे बॉक्स मधील साहित्य व त्या साहित्याच्या बिलाची तपासणी केली

वाहनामध्ये असलेल्या ७२ बॉक्समध्ये सोने, चांदी व गिफ्ट आर्टिकल असलेले एकंदर रू. २,०८, १७,८२०/- चा मुद्देमाल सापडला. तपासणी दरम्यान संबंधित कुरिअर चालकाने बॉक्सनिहाय त्यात समाविष्ट असणाऱ्या साहित्य व तपशील असणारे पक्के बिल सादर केले व अनुषंगिक खात्री पंचासमक्ष व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात आले. त्यानुसार एकूण ६० बॉक्स मध्ये असलेल्या सोने व चांदी चे गिफ्ट आर्टिकल चे २,०४,८६,२११/- ( रू.2 कोटी 4 लक्ष 86 हजार 211) चे बिल सादर केले. उर्वरित बॉक्समध्ये असलेल्या रू.३ लक्ष ३१ हजार ६०९/- चा मुद्देमाल ज्यात चांदी व चांदी चे काम असलेले गिफ्ट आर्टिकल असून त्याचे बिल संबंधितास सादर करता आले नाही. याबात पोलीस अधिक तपास करीत आहेत. सामानांची ने-आण करताना त्याची अधिकृत बिले सोबत ठेवावी. तपासणी दरम्यान अनधिकृत ऐवज व रक्कम सापडयास कारवाई केली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्व यंत्रणा निवडणूक शांततेत व निर्भयपणे पार पाडण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

संबंधित पोस्ट

अमरावतीतील युनियन बँक ऑफ इंडियाच्या राजापेठ शाखेत 59 लॉकर्समध्ये सुमारे 3.5 कोटी रुपयांच्या खऱ्या सोन्याच्या दागिन्यांऐवजी आता बनावट सोन्याचे दागिने सापडले आहेत

गडचिरोली पोलिसांची अवैध कोंबडा झुंज आणि जुगाराविरुद्ध मोठी कारवाई

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्यातील पलूसच्या महावितरण कार्यालयात ‘अँटी करप्शन’ची कारवाई,उपकार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता जाळ्यात : 45 हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडले*

vishwatmaklokswamivarta

ठाणे आणि जवळपास परिसरातील कारच्या खिडक्या आणि बॅग लिफ्टिंगमध्ये गुंतलेल्या टोळीचा पर्दाफाश: ठाणे पोलिसांच्या गुन्हे पथकाची कारवाई दोघांना अटक

औरंगाबाद येथे नवविवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा चौघांवर गुन्हा

vishwatmaklokswamivarta

पुण्यातील येरवडा कारागृहात खळबळ, सांकेतिक भाषेतील चिठ्ठीतून कैद्याने मागवला मोबाइल व तीन कंपन्यांचे सिम आरोपींना अटक 

vishwatmaklokswamivarta