vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

प्रचार साहित्यावर मुद्रक व प्रकाशकांचे नाव छापणे बंधनकारक — जिल्हाधिकारी किशन जावळे

प्रचार साहित्यावर मुद्रक व प्रकाशकांचे नाव छापणे बंधनकारक — जिल्हाधिकारी किशन जावळे

 

रायगड प्रतिनिधी- रायगड जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणूक आदर्श आचारसंहिता काळात संबंधित मुद्रक प्रिंटर्सनी प्रचार साहित्य तसेच इतर छपाई बाबत विशेष काळजी घेऊन आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.

लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१’ च्या ‘कलम १२७ क’ व्दारे निवडणूक पत्रकांच्या छपाईवर आणि प्रसिद्धीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. याकडे सर्व राजकीय पक्ष, निवडणूक लढविणारे उमेदवार आणि मुद्रणालयांच्या चालक व मालकांचे लक्ष वेधण्यात आले आहे.

 

हाताने नक्कल काढण्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रक्रियेने छापण्यात किंवा अनेक प्रती काढण्यात आलेले निवडणुकी संबंधीचे प्रत्येक पत्र, हस्तपत्रक, घोषणाफलक किंवा भित्तीपत्रक यांच्या दर्शनी भागावर मुद्रकांचे आणि प्रकाशकाचे नाव व पत्ता प्रसिध्द करणे बंधनकारक आहे. असे कोणतेही पत्रक मुद्रकांने इच्छुक प्रकाशकाकडून त्यांनी ते स्वत: स्वाक्षरीत केलेले आहे, त्या व्यक्तिला व्यक्तिश: ओळखतील अशा दोन व्यक्तींनी साक्षांकित केलेल्या त्या प्रकाशकांची ओळख पटवणारे प्रतिज्ञापत्र (दोन प्रती मध्ये) घेणे अत्यावश्यक आहे असे जिल्हाधिकारी श्री जावळे यांनी सांगितले. तसेच दस्तऐवज छापण्यात आल्यावर मुद्रकांने प्रतिज्ञापत्राची एक प्रत व पत्रक इत्यादींच्या चार प्रती संबंधित जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे तीन दिवसाच्या आत सादर कराव्यात. या सर्व प्रती मिडीया सेल मधील कक्षात जमा कराव्यात.

 

या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना सहा महिन्यांपर्यंत कारावास किंवा रुपये दोन हजारांपर्यंत दंडाची अथवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतात अशी तरतूद या नियमात असल्याचेही जिल्हाधिकारी श्री जावळे यांनी स्पष्ट केले.

संबंधित पोस्ट

केंद्र सरकारने सादर केलेल्या जीएसटी दर कपात आणि सुधारणांच्या प्रस्तावांना एकमताने संमती दिल्याबद्दल पंतप्रधानांनी जीएसटी परिषदेची केली प्रशंसा, सर्वसामान्य माणूस, शेतकरी, एमएसएमई, मध्यमवर्गीय, महिला आणि युवकांना याचा लाभ होईल

vishwatmaklokswamivarta

अन्न व औषध प्रशासनाकडून गणेश मंडळे व नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना

सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेमार्फत कंत्राटी पध्दतीने नेमणूकीसाठीनोंदणीकृत पात्र व इच्छुक सेवा सोसायट्यांनी प्रस्ताव करण्याचे आवाहन

रोजगार हमी योजना समितीच्या सदस्‍यपदी आमदार सुधाकर अडबाले यांची नियुक्‍तीसभापतींनी केली तीन समित्‍यांवर नियुक्‍ती..

मुंबई गोवा महामार्ग रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येकडे 17 वर्षापासून दुर्लक्ष करणाऱ्या शासन आणि राजकारण्यांच्या विरोधात कोकणकरांचे बेमुदत 15 ऑगस्ट पासून आमरण उपोषण

vishwatmaklokswamivarta

महिला गटाद्वारे उत्पादीत मालाच्या विक्रीला मिळणार हक्काची जागा – पालकमंत्री संजय राठोड

vishwatmaklokswamivarta