vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नाफेडतर्फे सोयाबीन खरेदीसाठी जिल्ह्यात दोन खरेदी केंद्र सुरु

नाफेडतर्फे सोयाबीन खरेदीसाठी जिल्ह्यात दोन खरेदी केंद्र सुरु

 

 

सांगली, प्रतिनिधी : जिल्ह्यात पणन हंगाम २०२४-२५ मध्ये आधारभूत दरानुसार नाफेडच्या वतीने सोयाबीन खरेदीकरिता शेतकऱ्यांची एन.ई.एम.एल पोर्टलवर दिनांक १५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत ऑनलाईन नोंदणी सुरु असून, खरेदी १२ जानेवारी २०२५ पर्यंत सुरु राहणार आहे. जिल्ह्यात विष्णुआण्णा खरेदी विक्री संघ सांगली (संपर्क – 7507777849 श्री. सूर्यकांत शिंदे) व ॲड. आर. आर. पाटील शेतकरी सह. खरेदी विक्री संघ, तासगाव (संपर्क – 9420360570 श्री. सुरेश सगरे) या दोन खरेदी केंद्रांवर ऑनलाईन नोंदणी व खरेदी प्रक्रिया सुरु झाली असल्याचे जिल्हा पणन अधिकारी संदीप जाधव यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

जिल्ह्यातील विष्णु आण्णा खरेदी विक्री संघ सांगली या खरेदी केंद्रास कवठेमहांकाळ, जत, शिराळा व वाळवा हे तालुके तसेच ॲड. आर आर पाटील शेतकरी सह. खरेदी विक्री संघ, तासगाव खरेदी केंद्रास पलूस, कडेगाव, आटपाडी व खानापूर हे तालुके सोयाबीन खरेदीकरिता जोडण्यात आलेले आहेत. ज्या शेतकऱ्यांना हमीभाव खरेदी केंद्रांवर सोयाबीन विक्री करावयाची आहे, अशा शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी चालू हंगामातील सोयाबीन पिकाची पीक पेरा ऑनलाईन नोंद असलेला अद्ययावत मूळ सातबारा उतारा, बँक खात्याच्या पासबुकची साक्षांकित प्रत, (IFSC CODE ) सहीत, आधारकार्ड प्रत तसेच शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांक इ. कागदपत्रे आवश्यक आहेत.

  शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीकरीता आणण्यापूर्वी व्यवस्थित वाळवून त्यामधील आर्द्रतेचे प्रमाण 12 टक्के पेक्षा कमी असल्याची व FAQ दर्जाचे सोयाबीन असल्याची खात्री करावी. त्यासाठी सोयाबीनचे नमुने खरेदी केंद्रावर आणून त्यातील आर्द्रता तपासावी व ती 12 टक्के पेक्षा कमी असल्यासच सोयाबीन खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणावे. जेणेकरुन जास्त आर्द्रतेमुळे आपले सोयाबीन परत नेण्याची वेळ येणार नाही, असे आवाहन पत्रकात करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते ‘श्रीं’ची आरती

मराठा-कुणबी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ लाभार्थींसाठी महिला नागरी सहकारी पतसंस्थांची नोंदणी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

vishwatmaklokswamivarta

बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितने मुंबईत खरेदी केलं 48 कोटी रुपयांचे नवीन घर तयार…

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्७५ हजार युवक-युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षणाची संधी- मंत्री मंगलप्रभात लोढा

vishwatmaklokswamivarta

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर-स्वच्छता कर्मचाऱ्यांनी राबविले मतदान जनजागृती अभियान

vishwatmaklokswamivarta