ठाणे जिल्ह्यात दि.11 नोव्हेंबर पर्यंत-23 कोटी 41 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
ठाणे, प्रतिनिधी:- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात व ठाणे जिल्ह्यात भारत निवडणूक आयोगामार्फत आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या आचारसंहिता काळात नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात प्रशासनामार्फत कठोर कारवाई करण्यात येते. या अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांमधून दि.11 नोव्हेंबर 2024 पर्यंत एकूण 23 कोटी 41 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल प्रशासनाकडून जप्त करण्यात आला आहे.
यामध्ये 12 कोटी 41 लाख 16 हजार रोख रक्कम, 2 कोटी 22 लाख 14 हजार रुपये किंमतीचा मद्यसाठा, 1 कोटी 64 लाख 70 हजार रुपये किंमतीचे अंमली पदार्थ, 23 लाख 26 हजार रुपये किंमतीच्या मौल्यवान वस्तू / दागिने आणि 6 कोटी 89 लाख 79 हजार रुपये किंमतीचे मोफत वाटपाचे साहित्य ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांमधून प्रशासनाकडून जप्त करण्यात आले आहे