लाडक्या बहिणीच्या नारीशक्ती सोबत आंबेडकरी जनतेच्या भीमशक्ती मुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय — केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले
राज्य प्रतिनिधी
मुंबई – महाराष्ट्रात महायुती चा महाविजय झाला आहे. राज्यात लाडक्या बहिणीची नारी शक्ती ; सर्व समाज घटकांचा कौल महायुतीला मिळाला त्यासोबत दलित बौद्ध आंबेडकरी जनतेने महायुतीला भरघोस मतदान केल्या मुळे महायुती चा ऐतिहासिक विजय झाला आहे. नरेंद्र मोदींनी केलेला आहे देशाचा विकास; त्यामुळे दिसत आहे महायुतीच्या विजयाचा विकास; आज आम्हाला दिसत आहे निळ निळ आकाश ; महाविकास आघाडी झाली आहे भकास अशी चारोळी सादर करीत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या झालेल्या ऐतिहासिक विजयाचे स्वागत केले आहे .महायुती च्या सराव घटका पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आणि रिपब्लिकन कार्यकर्त्यांच्या मेहनतीला यश आल्यानेच महायुतीला अभूतपूर्व यश लाभल्या बद्दल ना.रामदास आठवले यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आणि राज्यभरातील जनतेचे आभार मानले आहेत.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने संविधान बदलणार असा खोटा प्रचार केला. त्यामूळे जनतेच्या डोळ्यात खोट्या प्रचाराची धूळफेक करणाऱ्या महाविकास आघाडीला जनतेने पराभवाची धूळ चारली आहे .लाडकी बहिण योजनेला विरोध करणाऱ्या महाविकास आघाडीला महिलांनी चांगलाच धडा शिकवून महायुतीला ऐतिहासिक विजयाची भाऊबीज भेट दिली आहे असे सांगत ना.रामदास आठवले यांनी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले आहेत.
बांद्रा येथील जनसंपर्क कार्यालयाबाहेर रिपब्लिकन पक्षाक्या वतीने महायुती चा महविजय ढोल वाजवून फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला यावेळी ना.रामदास आठवले यांनीही ढोल वाजवून महायुती चा विजय साजरा केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन ना.रामदास आठवले यांनी महायुती च्या तिन्ही नेत्यांचे अभिनंदन केले.
10वर्षामध्ये 10 लाख कोटी पेक्षा जास्त पैसे महाराष्ट्राच्या विकासासाठि केंद्राकडून मिळाले आहेत.नरेंद्र मोदीजींनी गरिब,युवा,महिला,दलित,आदिवासी आणि ओबीसी या सर्वासाठी काम केलेले आहे.या महाराष्ट्रातील जनतेले भरभरुन आम्हाला पाठिंबा दिलेला आहे.एकतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चुकीच्या पध्दतीने माननीय नरेंद्र मोदीजींना बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता.एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हणुन टोमणे मारण्यात आले होते आणि त्यांचा परिणाम म्हणुन राऊत यांना यांना चांगली चपराक