जागतिक एड्स दिनानिमित्ताने आयोजित-प्रभात फेरीला युवकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
जालना, प्रतिनिधी:- महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई यांच्या मार्गदर्शनानुसार दिनांक 2 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 9 वाजता जिल्हा रुग्णालय जालना येथे जागतिक एड्स दिनानिमित्त प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. जालना येथील जिल्हा रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त प्रभात फेरीचे उदघाट्न हिरवी झेंडी दाखवून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. रॅलीस युवकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
रॅलीची सुरवात जिल्हा रुग्णालय जालना येथून होऊन मार्ग सतकर कॉम्प्लेक्स, शनी मंदिर, गांधी चमन येथे समारोप करण्यात आला. याप्रसंगी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र गाडेकर यांच्यासह डापकु, एआरटी, आयसीटीसी, सुरक्षा क्लिनिक इत्यादी विभागातील कर्मचारी वर्ग, तसेच अशासकीय संस्था यांच्यासह परिचारिका प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थींनी व कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थींनी तसेच राज्य राखीव पोलिस दलाच्या बँड पथकासह पोलिस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी पोलिसांची उपस्थिती होती