vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

माझी वसुंधरा अभियानची अंमलबजावणीकोकण विभागात अधिक प्रभावीपणे करावी- कोकण विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख

माझी वसुंधरा अभियानची अंमलबजावणीकोकण विभागात अधिक प्रभावीपणे करावी- कोकण विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख

 

ठाणे, प्रतिनिधी- पर्यावरणातील बदल लक्षात घेता माझी वसुंधरा अभियान ५.० हा कार्यक्रम कोकण विभागात वेगाने राबवावा, प्रत्येक यंत्रणेने या अभियानात सक्रिय व्हावे, असे प्रतिपादन कोकण विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांनी केले.

माझी वसुंधरा अभियान ५.० च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासकीय यंत्रणांना मार्गदर्शन करण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच विभागीयस्तरिय ऑनलाईन दूरदृश्यप्रणालीद्वारे आढावा बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. या आढावा बैठकीत संचालक (माझी वसुंधरा अभियान) सुधाकर बोबडे, उपायुक्त (नगरपरिषद प्रशासन) गणेश शेटे, उपायुक्त (विकास) डॉ. प्रदीप घोरपडे, सहायक आयुक्त (नगरपरिषद प्रशासन) सागर घोलप, तसेच कोकण विभागातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा सह आयुक्त (नगपरिषद प्रशासन), नगपरिषदेचे मुख्याधिकारी, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी या वेळी उपस्थित होते.यावेळी विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख म्हणाले की, हा शासनाचा महत्वपूर्ण कार्यक्रम आहे. वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणे आवश्यक आहे. शासकीय अधिकाऱ्यांनी माझी वसुंधरा अभियानामध्ये भूमी, वायू, जल, अग्नी, आकाश या पंचतत्वावर काम अधिक व्यापक होण्याकरिता मार्गदर्शक सूचनांचे पालन करून कोकण विभागात हे अभियान यशस्वी करावे.

या आढावा बैठकीत माझी वसुंधरा अभियान ५.० चे भूमी, जल, वायू, अग्नी, आकाश तत्वावर आधारित टूलकीटचे सविस्तरपणे प्रेझेंटेशन माझी वसुंधरा अभियानाचे संचालक सुधाकर बोबडे व त्यांच्या पथकाने केले.भूमी घटकामध्ये वृक्ष लागवड, रोपवाटिका निर्मिती, बांबू-खस-शेवगा लागवड, बीज संकलन, घनकचरा व्यवस्थापन, ओला-सुका कचरा प्रक्रिया, सिंगल युज प्लास्टिक बंदी तसेच वायू घटकामध्ये वायू गुणवत्ता परीक्षण, फटक्यावर बंदी, ईलेक्ट्रिकल वाहन धोरण, वातावरण बदल जनजागृती आणि जलघटकामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प बसविणे, भूजल पुनर्भरण, सांडपाणी प्रक्रिया, पाणथळ जागांचे संवर्धन यांचा समावेश असून अग्नी घटकामध्ये निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जानाबाबत प्रसार व प्रचार, हरित पथदिवे, हरित इमारती, कूल रूफिंग तर, आकाश घटकामध्ये ई शपथ, अभियानामध्ये स्पर्धा व जनजागृती, पर्यावरण दूत, तरुणांचा सहभाग, माझी वसुंधरा तत्वे दर्शविणारे प्रचार व प्रसिद्धी, बचतगट सहभाग, शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग करून घेणे या बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

माझी वसुंधरा अभियान ५.० मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत अधिक प्रभावीपणे कामे करून राज्यस्तरीय मानांकन प्राप्त करण्यासाठी शहरांच्या मुख्याधिकारी यांनी विशेष प्रयत्न करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. देशमुख यांच्या मार्फत उपस्थितांना देण्यात आल्या….

संबंधित पोस्ट

नागरी संरक्षण दलामार्फत टिटवाळा (पूर्व) येथे मॉक ड्रीलचे आयोजन

महसूल कर्मचाऱ्यांनी मिळालेल्या संधीचा उपयोग सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी करावा-जिल्हाधिकारी आंचल गोयल

गोरेगाव मतदारसंघातील *मोतीलाल नगर क्रमांक १,२ व ३* च्या पुनर्विकासाबाबत*आमदार व माजी राज्यमंत्री विद्या ठाकुर* यांच्या मार्गदर्शनाखाली रहिवाशांसोबत चर्चा सत्राचे आयोजन

विलास सहकारी साखर कारखान्यास साखर आयुक्तालय,पुणेचे संचालक यशवंत गिरी यांची सदिच्छा भेट मांजरा परीवारातील संस्थाच्या कामकाजाचे केले कौतूक ऊस तोडणी यांत्रिकीकरण व आर्थिक नियोजनाबाबत गौरवोद्गार.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अन्नधान्याचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी (शिधापत्रिकाधारक) ई-केवायसी प्राथम्याने पूर्ण करावी

विकसित भारतासाठी ड्रग्जमुक्त युवक’ या थीमसह वाराणसीतील रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटर येथे ‘युवा आध्यात्मिक शिखर परिषद’ सुरू; भारतातील सुमारे १२२ आध्यात्मिक आणि सामाजिक-सांस्कृतिक संघटनांमधील ६०० हून अधिक तरुण सहभागी