vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

.. तर लाडक्या बहिणींना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडणार – मा.आ.कैलास गोरंटयाल

.. तर लाडक्या बहिणींना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडणार – मा.आ.कैलास गोरंटयाल

—————————————-

जालना (प्रतिनीधी) लाडकी बहिण योजनेचे निकष बदलण्याच्या हालचाली शासनस्तरावर होत आहेत. मात्र, सदर योजनेच्या निकषात बदल केल्यास लाडक्या बहिणींना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा स्पष्ट इशारा मा.आ.कैलास गोरंटयाल यांनी दिला आहे.

राज्यात विधानसभेच्या निवडणुकीत पराभव अटळ असल्याच्या भीतीमुळे महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेचे निकष निश्चित करतांना सत्ताधारी पार गोंधळलेल्या अवस्थेत असल्याचे प्रामुख्याने दिसून आले. या गोंधळाच्या स्थितीमुळेच योजना सुरू केल्यानंतरही निकषात अनेकवेळा बदल करण्याची नामुष्की राज्यकर्त्यांवर ओढवली अशी टीका गोरंटयाल यांनी केली. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजने अंतर्गत पात्र असलेल्या लाडक्या बहिणींना राज्यात सरकार आल्यास प्रतिमहा १५०९ रूपया ऐवजी २१०० रुपये देण्याची घोषणा राज्यातील महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी निवडणूक प्रचारा दरम्यान केली आणि आपल्या पदरात राज्यातील लाखो महीला भगिनिंचे मतदान पाडून घेतले. या लाडक्या बहिणींच्या बळावरच राज्यात महायुतीने पुन्हा एकदा सत्ता हस्तगत केली असतांना सत्तेवर येण्यापूर्वीच लाडकी बहीण योजनेच्या निकषात बदल करण्याच्या हालचाली शासनस्तरावर सुरू असल्याचे दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी ज्या निकषानुसार लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात आला त्याच निकषानुसार पात्र महीला भगिनींना योजनेचा लाभ देवून महायुतीच्या नेत्यांनी निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी अशी मागणी करून जर राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या निकषात बदल करण्याचा प्रयत्न केला तर याच लाडक्या बहिणींना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मा.आ.कैलास गोरंटयाल यांनी दिला आहे.

संबंधित पोस्ट

स्त्री ही नैसर्गिक शक्तिमान असती तिच्या पाठीवर कौतुकाची थाप पडल्यास तिला अधिक लढण्याची बळ मिळते –संजीवनी ताडेगावकरआधार ग्रुपने केला विविध क्षेत्रातील कर्तुत्ववान महिलांचा गौरव

vishwatmaklokswamivarta

कोल्हापूर, सांगली, सातारा येथे ‘ग्लोबल केपेबिलिटी सेंटर’ स्थापन करण्यात येणार – उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई येथील थ्री आर सेंटर्समधील कपडे संकलन मोहीम तसेच ई – वेस्ट संकलन मोहीम नागरिकांच्या उत्तम प्रतिसादाने यशस्वी

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानात राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय, नमुंमपा शाळा क्र. 55, आंबेडकरनगर, रबाळे राज्यातील 98 हजार शाळांतून व्दितीय क्रमांकाची मानकरी..

vishwatmaklokswamivarta

माहीम नवरंग कंपाऊंड येथे लागली भीषण आग…

vishwatmaklokswamivarta

समाजमाध्यमांद्वारे ग्राहकांच्या हक्कांची व अधिकारांची जनजागृती करा – अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने

vishwatmaklokswamivarta