vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

उद्या मुंबईमध्ये  मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक; रेल्वे प्रवाशांना माहिती…

उद्या मुंबईमध्ये  मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक; रेल्वे प्रवाशांना माहिती…

 

मुंबई प्रतिनिधी- मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी रविवारी 15 डिसेंबर रोजी लोकलने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर उद्या मेगाब्लॉक आहे हे लक्षात ठेवा. लोकलचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा. नाही तर तुमच्या प्रवासाचा खोळंबा होईल हे नक्की. कारण रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक  घेण्यात येणार आहे

मध्य रेल्वे, हार्बर मार्गावर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या दरम्यान, रुळांची दुरुस्ती, अभियांत्रिकी आणि देखभाल तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक बिघाडाची कामं करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या विद्याविहार आणि ठाणे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या लाईनवर सकाळी 8 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस कडे जाणाऱ्या रेल्वे विद्याविहार स्थानकावर सहाव्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि गंतव्यस्थानावर 10 ते 15 मिनिटे उशीरा पोहोचेल.

 हार्बर रेल्वे मार्गावर असा राहिल मेगाब्लॉक-पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 पर्यंत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक -पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 पर्यंत पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशी भागावर विशेष लोकल चालवण्यात येतील. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल. ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट लाईन सेवा उपलब्ध असेल. हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत.

संबंधित पोस्ट

अतिवृष्टीच्या काळात नवी मुंबई महानगरपालिकेची आपत्तकालीन यंत्रणा मदतीसाठी सज्ज,काही सखल भाग वगळता नवी मुंबईतील जनजीवन सुरळीत

दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या वस्तुंच खरेदी करून त्यांना प्रोत्साहित करावे- जिल्हाधिकारी अशोक काकडे- दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या वस्तुंचे प्रदर्शन- प्रदर्शनात 13 शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग, वस्तू विक्रीतून 31 हजार जमा…

राज्यातील नाशिक रेड अलर्ट-आज आणि उद्या नाशिक जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी…

vishwatmaklokswamivarta

मालाडजवळील रणांगल बीच जवळ मच्छिमार समाजाचे स्मशानभूमी पाडल्याप्रकरणी मुंबई हायकोर्ट कडून मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना समन्स…

vishwatmaklokswamivarta

गुणवत्ता आणि मुदतीबाबत तडजोड खपवून घेणार नाही*प्रलंबित रस्ते कामांवर जिल्हाधिकाऱ्यांचा राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम यंत्रणांना कडक इशारा …

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यात शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२५ यशस्वीरित्या पार पडली

vishwatmaklokswamivarta