भारतीय जनता पार्टी चे नेते माजी अध्यक्ष लालकृष्ण आडवाणी यांची प्रकृती अचानक बिघडली रुग्णालयात दाखल…
नवी दिल्ली प्रतिनिधी- भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ आणि ज्येष्ठ नेते लाल कृष्ण आडवाणी यांना आज सकाळी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात प्रकृती बिघडल्याने दाखल करण्यात आले आहे काही दिवसापासून त्यांची प्रकृती सतत बिघडत असल्याने आज अचानक प्रकृती जास्त खराब झाल्याने त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
याबाबतची प्राप्त माहिती अशी की, भाजपचे ज्येष्ठे नेते लालकृष्ण आडवाणी यांना शनिवारी सकाळी दिल्लीतल्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मागच्या काही दिवसांपासून आडवाणी यांची प्रकृती खराब आहे. शनिवारी अचानक त्यांची प्रकृती बिघडली. यानंतर तातडीने त्यांना अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
आडवाणी यांना अशाप्रकारे रुग्णालयात दाखल करण्याची पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वी मागच्या चार ते पाच महिन्यात आडवाणी यांना चौथ्यांदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.