
दिव्यांग कल्याण समितीसाठी अशासकीय सदस्याची नावे सादर करावेत
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य दिव्यांगत्व संशोधन समितीकरीता अशासकीय सदस्य नियुक्ती करण्यात येणार असून इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. दिव्यांग कल्याण क्षेत्रात कार्यरत नामवंत व तज्ज्ञ व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती व दिव्यांगांच्या स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधीत्व करणारे दिव्यांग पदधिकारी व सदस्य यांची नावे शासनास सादर करण्यात येणार आहेत. त्यासाठी इच्छुक पात्र व्यक्तिंनी आपले अर्ज दि.२५ डिसेंबर पूर्वी समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर या कार्यालयात कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष येऊन अर्ज सादर करता येईल. संबंधितानी अर्ज प्राप्त करुन परिपूर्ण प्रस्ताव तीन प्रतीत जिल्हा समाज कल्याण अधिकारी,जिल्हा परिषद या कार्यालयात दि.२५ डिसेंबर पूर्वी सादर करावे असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी एस.डी.चव्हाण यांनी केले आहे.
०००००



