vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

आज 27 डिसेंबर रोजी जिल्हा नियोजन भवन येथे “स्वामित्व” योजनेंतर्गत गावठाण भूमापन सनद वितरण कार्यक्रमाचे आयोजन….

आज 27 डिसेंबर रोजी जिल्हा नियोजन भवन येथे “स्वामित्व” योजनेंतर्गत गावठाण भूमापन सनद वितरण कार्यक्रमाचे आयोजन….

 

     *रायगड प्रतिनिधी:-* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि.24 एप्रिल 2020 रोजी स्वामित्व योजनेचे उद्घाटन केले होते. या योजनेचा उद्देश गावातील अबादी क्षेत्रातील घरांसाठी सनद व मालमत्ता पत्रक, देणे हा आहे. यासाठी ड्रोन तंत्रज्ञान आणि प्रगत नकाशांकन तंत्राचा उपयोग केला जातो. ही योजना ग्रामीण समुदायांच्या आर्थिक समावेशनात सुधारणा, पतपुरवठ्यास सुलभता आणि एकूणच सामाजिक-आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी महत्वाची भूमिका बजावते.

  दि.27 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “स्वामित्व” योजनेंतर्गत 50 लाखांहून अधिक घरमालकांना मालमत्ता पत्रकाचे/ सनदेचे ई-वितरण सुरु होणार असून ते या योजनेतील निवडक लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी इत्यादींच्या उपस्थितीत स्थानिक कार्यक्रमांद्वारे सनदेचे प्रत्यक्ष वितरण करण्यात येणार आहे.

त्याअनुषंगाने रायगड जिल्हयामध्ये १३ तालुक्यांतील ५८ गावांमध्ये ५१ ग्रामपंचायतीचे ठिकाणी ५ हजार २०० सनदांचे वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये लाभार्थ्यांना स्वामित्व योजनेबद्दल तसेच मिळकत पत्रिका / सनद याचे महत्त्व याकरीता प्रशिक्षण देण्यात येणार असून लाभार्थ्यांना सनद वाटप करण्यात येणार आहे. याकरीता जिल्हा परिषदेचे अधिकारी यांचे समवेत संयुक्तपणे कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आलेले आहे.

जिल्हा स्तरावर महिला व बालविकास मंत्री, मा. ना. कु. अदिती तटकरे प्रमुख पाहुणे यांचे उपस्थितीत दि. २७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वा. नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय रायगड, अलिबाग येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे असे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सुनिल इंदूलकर यांनी कळविले आहे.00000

संबंधित पोस्ट

अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून कर्ज प्रक्रियेबाबत खुलासा;अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

राज्याच्या खेडोपाड्यातील ७ कोटी लाभार्थ्यांना धान्यवाटप करणाऱ्या शिधावाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रतिक्विंटल २० रुपयांची वाढ करुन ते १५० रुपयांवरुन १७० रुपये करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री तथा अन्न व नागरीपुरवठा मंत्री अजित पवार

समग्र शिक्षा अभियानाचे सूक्ष्म नियोजन करावे- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे…

vishwatmaklokswamivarta

जिल्हा रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत अपघात रोखण्याच्या उपाययोजनांवर चर्चा,अपघातांच्या ‘ब्लॅक स्पॉट’चे संयुक्त सर्वेक्षण करत उपाययोजना निश्चित करा   –जिल्हाधिकारी किशन जावळे

महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची मुंबईत जय्यत तयारी, विकासकामांचा धडाका..

आग्र्यातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या उभारणीची जबाबदारी पर्यटन विभागाकडे, तज्ज्ञांची समिती स्थापन होणार शिवजयंती दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेची अंमलबजावणी…