vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

बुलढाणा पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी मनोहर मोरे यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा

बुलढाणा पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी मनोहर मोरे यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा

 

बुलढाणा, प्रतिनिधी: बुलढाणा पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी मनोहर हरिभाऊ मोरे हे नियत वयोमानानुसार 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहे. त्याअनुषंगाने जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा दहिद बु .केंद्र पाडळी पंचायत समिती, बुलढाणा या ठिकाणी सेवानिवृत्ती गौरव सोहळाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते श्री. मोरे यांचे सपत्नीक सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दहिद बुद्रुक गावचे सरपंच अर्जुन भाऊ दांडगे, प्रमुख अतिथी दहिद बुद्रुक गावचे भूमिपुत्र अनिलजी देवकर, जिल्हा परिषद उपशिक्षण अधिकारी तसेच पंचायत समिती बुलढाणाचे गटशिक्षणाधिकारी पी.एस.मोरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दहिद बुद्रुक गणेशजी देवकर,पाडळी केंद्राच्या केंद्रप्रमुख सुनिता शिंदे, डोंगर खंडाळा केंद्राचे केंद्रप्रमुख इंगळे, पांगरी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. म्हस्के, बुद्रुक गावचे तंटामुक्ती अध्यक्ष राजूभाऊ राजपूत, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य दहिद बुद्रुक ज्ञानेश्वर राऊत आदि उपस्थित होते.

सर्वप्रथम सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मॉसाहेब तसेच विद्येची आराध्य देवी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. प्रतिमापूजनानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. आयएसओ दर्जा प्राप्त शाळा इजलापुर या शाळेला आयएसओ दर्जा मिळवून देणारे मुख्याध्यापक शरदचंद्र बोराडे, आर. पी. जाधव, सहायक अध्यापक इजलपुर मुरलीधर टेकाळे यांचे मान्यवरांच्या हस्ते विशेष स्वागत आणि सत्कार करण्यात आला.

सत्कारानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख सुनिता शिंदे यांनी केले. प्रास्ताविकानंतर आजच्या सेवानिवृत्ती गौरव सोहळ्याचे सत्कारमूर्ती पाडळी केंद्राचे माजी केंद्रप्रमुख तथा विद्यमान शिक्षण विस्तार अधिकारी मनोहर हरिभाऊ मोरे यांचा जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी अनिल देवकर, पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी पी.एस.मोरे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. सत्कार सोहळा आटोपल्यानंतर उपस्थित मान्यवरांनी श्री. मोरे यांच्या कार्यकर्तृत्वाच्या संदर्भात मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पंडित सपकाळ यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक अध्यापक दहिद बुद्रुक जयश्री जाधव यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद शाळा दहिद बुद्रुक येथील श्री पालकर, श्री मुळे, सौ. गायकवाड तसेच पाडळी केंद्रातील सर्व शिक्षक वृंद गणेश भाऊ देवकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, समिती सदस्य यांनी मेहनत घेतली00000

संबंधित पोस्ट

वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲङ निलेश हेलोंडे पाटील यांची शेतकरी आत्महत्या कुटूंबास भेट

सार्वत्रिक विधानसभा निवडणूक-2024:सात मतदारसंघात 199 जणांचे 280 नामनिर्देशन अर्ज दाखल

vishwatmaklokswamivarta

नांदेडच्या भूमीवर होणारा शहीदी समागम राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक: मुख्यमंत्री भगवंत मान

vishwatmaklokswamivarta

जिल्हास्तरीय शालेय(मुले) फुटबॉल लिग स्पर्धा; 10 जानेवारीपर्यंत अर्ज आमंत्रित

पनवेल येथे दुचाकी वाहनांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांकासाठी नवीन मालिका सुरु

सर्वसामान्य नागरिकांसाठी दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध- पालकमंत्री चंद्रकांत पाटील मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विविध कामांचा कार्यारंभ