vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुक

भरतनाट्यम् गुरू अर्चना वासडीकरचे यश…

भरतनाट्यम् गुरू अर्चना वासडीकरचे यश…

 

जालना, (प्रतिनिधी) – छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे राज्य सरकार आणि नेहा पटनायक यांच्या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने शास्त्रीय नृत्याचे ‘नृत्य वंदनम्’ या कार्यक्रमाद्वारे दोन जागतिक कीर्तीचे रेकॉर्ड झाले. यात जालना येथील भरतनाट्यम् गुरू अर्चना वासडीकर व त्यांच्या शिष्यांनी केलेल्या नृत्याची जागतिक नोंद झाली.‘नृत्य वंदनम्’साठी देश विदेशातील अनेक गुरुंना आमंत्रित करण्यात आलेहोते. देशभरातील ५० आणि विदेशातील ३० अशा सर्व गुरूंचा तेथे आदर सत्कार करण्यात आला. त्यांच्या शिष्यांनी अखंड तेरा तासांचे नृत्य सादरीकरण करून जागतिक नोंदणी झाली. भारत बुक ऑफ रेकॉर्ड आणि कलाकार बुक ऑफ वर्ल्ड

रेकॉर्ड अशा दोन पुस्तकांमध्ये ही नोंदणी झाली. यामध्ये जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथील भरतनाट्यम् गुरू अर्चना सांगरोळकर-वासडीकर यांना देखील आमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या शिष्या नवदुर्गा- मृणाल,सई,वेदश्री, अभिज्ञा, तृप्ती, वैष्णवी, श्रावणी,प्राजक्ता आणि तनुजा यांनी १३ तासाच्या या रेकॉर्डमध्ये अप्रतिम सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संकेत सांगरोळकर, आमोद वासडीकर, अश्विनी वासडीकर यांच्यासहपालकांनी परिश्रम घेतले.

संबंधित पोस्ट

जालना येथे ‘द पॅशन ऑफ द क्राईस्ट’ नाटकाचे भव्य आयोजन

विमल दिवस निमित्ताने मुंबई विद्यापीठ कलिना परिसरात विविध कार्यक्रम-राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर लिखित रश्मिरथी नाटकाचा प्रयोगअर्चना शंभरकर याच्या हिंदी पुस्तकाचे होणार लोकार्पण…

भारतीय चित्रपटसृष्टीतील ‘ऑस्कर’ अकॅडमी पुरस्काराने गौरविलेल्या प्रख्यात वेशभूषाकार भानू अथैय्या यांच्या जीवनकार्याला अभिवादन करण्यासाठी ‘भानू अथैय्या : साधनेतून सन्मानाकडे’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

दिल्लीच्या दोन दिवसीय शास्त्रीय कार्यक्रमात ‘स्वरसुधा’चा सहभाग

vishwatmaklokswamivarta

भारतकुमार’ यांना अखेरचा दंडवत!- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

गडचिरोलीच्या मनोरंजन क्षेत्रात नवा अध्याय – वातानुकूलित सिनेमागृहाचे उद्घाटन-राज्यात नगरपालिका क्षेत्रातील पहिले मॉडेल सिनेमा थिएटर गडचिरोलीत सुरू