vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुकप्रदेश

गडचिरोलीच्या मनोरंजन क्षेत्रात नवा अध्याय – वातानुकूलित सिनेमागृहाचे उद्घाटन-राज्यात नगरपालिका क्षेत्रातील पहिले मॉडेल सिनेमा थिएटर गडचिरोलीत सुरू

गडचिरोलीच्या मनोरंजन क्षेत्रात नवा अध्याय – वातानुकूलित सिनेमागृहाचे उद्घाटन-राज्यात नगरपालिका क्षेत्रातील पहिले मॉडेल सिनेमा थिएटर गडचिरोलीत सुरू

 

गडचिरोली, प्रतिनिधी : राज्यातील नगरपालिका क्षेत्रात पहिल्यांदाच गडचिरोली शहरात वातानुकूलित मोबाईल सिनेमा थिएटर सुरू करण्यात आले असून, याचा उद्घाटन समारंभ आज जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा व आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

या उद्घाटन प्रसंगी नगरपरिषद मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, प्रशांत वाघरे, योगीता पीपरे, प्रमोद पीपरे, सूरजीत रॉय, अनिल कुनघाडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी यावेळी सांगितले की, “गडचिरोली शहरासाठी हा मनोरंजन क्षेत्रातील एक ऐतिहासिक क्षण आहे. जिल्हा नियोजन विकास निधीतून या सिनेमा गृहासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करून नगर परिषदेच्या माध्यमातून हे सिनेमागृह उभारण्यात आले आहे.” या सिनेमागृहात पुढील टप्प्यात किड्स झोन, फूड कोर्ट आणि विविध सुविधा सुरू करण्यात येणार असून, या सिनेमा गृहाला मॉडेल सिनेमा थिएटर म्हणून विकसित केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या उपक्रमामुळे गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल, दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार मनोरंजनाची सोय उपलब्ध होणार असून, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात आणखी एक सकारात्मक पाऊल ठरणार आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “हे सिनेमा थिएटर गडचिरोलीच्या सांस्कृतिक आणि मनोरंजन क्षेत्रात मानाचा तुरा ठरेल. येथे केवळ करमणूकप्रधानच नव्हे, तर सामाजिक प्रबोधन करणारे चित्रपटही दाखवण्यात येणार आहेत, जे समाजाला सकारात्मक संदेश देतील.”

मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांनी हे सिनेमा गृह अल्पावधीत उभे राहण्यासाठी जिल्हाधिकारी श्री पंडा व आमदार डॉ. नरोटे यांचे सहकार्य मोलाचे ठरल्याचे नमूद केले. त्यांनी येत्या काळात इतर पूरक सुविधा लवकरच उभारण्यात येतील असेही सांगितले.

हे सिनेमा थिएटर विशेष प्रकारच्या हवेने फुगवलेल्या तंबूमध्ये तयार करण्यात आले असून, त्यात वातानुकूलनाची सुविधा आहे. यामध्ये एकूण १२० प्रेक्षक बसण्याची व्यवस्था असून, दररोज चार शो दाखविण्यात येणार आहेत.

कार्यक्रमाचे संचालन आनंद खुने यांनी केले, तर उपस्थितांचे आभार गणेश ठाकरे यांनी मानले.

संबंधित पोस्ट

बळीराजाच्या कल्याणासाठी शासकीय अधिकाऱ्यांबरोबरच लोकप्रतिनिधींनीही एकत्रित पुढाकार घ्यावा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जैन संत व स्वातंत्र्य सेनानी आचार्य जवाहर लाल महाराज . त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुद्रा तसेच टपाल तिकीट काढून त्यांच्या कार्याची माहिती भावी पिढ्यांना देण्याचे कार्य स्तुत्य आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध-पालकमंत्री मकरंद जाधव पाटील· पालकमंत्र्याच्या हस्ते ध्वजारोहण· पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांना श्रद्धाजंली.

उष्णता लाटेच्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी राज्य शासन सज्ज -आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन नागपुरात ‘राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था’ (एसआयडीएम)

निवासी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेशाची सुवर्णसंधी इच्छुकांनी 15 मे पूर्वी अर्ज सादर करावेत..

बैलपोळ्यासह बुलढाण्यात झाला अनोखा “ट्रॅक्टर पोळा”!मेहकरमध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव स्वतः ट्रॅक्टर चालवत सहभागी; शेकडो शेतकरी ट्रॅक्टर रॅलीत सहभागी होऊन सणाला दिला आधुनिक रंग.