vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित प्रभात फेरीस उत्स्फूर्त प्रतिसाद

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित प्रभात फेरीस उत्स्फूर्त प्रतिसाद

 

         सांगली, प्रतिनिधी: राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदार जनजागृतीसाठी आयोजित प्रभात फेरीस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्टेशन चौक सांगली येथून प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थितांनी राष्ट्रीय मतदार दिनाची प्रतिज्ञा घेतल्यानंतर प्रभारी उप जिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल कनिचे यांनी प्रभात फेरीस हिरवा झेंडा दाखवला. स्टेशन चौक ते काँग्रेस भवन या मार्गावर ही प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, सांगली अप्पर तहसिलदार अश्विनी वरूटे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी रूपाली सोळंके यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 नवीन मतदारांची मतदार नोंदणी करणे, मतदारांमध्ये मतदान विषयक जनजागृती करणे, प्रत्येक मतदाराला आपल्या मताचे मुल्य कळावे या हेतूने राष्ट्रीय मतदार दिन आपण साजरा करतो असे सांगून प्रभारी उप जिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल कनिचे म्हणाल्या, भारताचे सुरक्षित भवितव्य आपल्या हातात आहे. यासाठी मतदार नोंदणी करून सर्वांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 यावेळी मतदार जनजागृतीसाठी पथनाट्य सादर करण्यात आले. या प्रभात फेरीस विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, निवडणूक कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला.

00000

संबंधित पोस्ट

केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील खासदारांची टि.बी.मुक्त संकल्प सभा संपन्न…!केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अभियानाला गती देण्यासाठी केले लोकप्रतिनीधींना आवाहन… ! !

vishwatmaklokswamivarta

अतिरेक्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानशी भारताची मैत्री कधीही होणार नाही ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*प्रधानमंत्री मोदींची विकासाची गाडी कोणी अडवू शकत नाही*

अभिजात मराठी भाषा सप्ताहः विश्वकोश मंडळातर्फे भूविज्ञान नोंद लेखन कार्यशाळा,जनसामान्यांना पृथ्वीविषयी सोप्या भाषेत माहिती द्या-डॉ.मिलिंद दुसाने

करियर निवडीसाठी मानसशास्त्रीय मार्गदर्शन कार्यशाळा

vishwatmaklokswamivarta

मधाचे गांव मांघर येथे मधपेट्या वाटप

vishwatmaklokswamivarta

मुंबई उपनगर जिल्ह्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र.१’ चे आयोजन