vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

दहावीदहावी व बारावी विद्यार्थ्यांचे ग्रेस गुण अर्ज आपले सरकार पोर्टलवरच ऑनलाईन स्विकारले जाणार

दहावीदहावी व बारावी विद्यार्थ्यांचे ग्रेस गुण अर्ज आपले सरकार पोर्टलवरच ऑनलाईन स्विकारले जाणार

 

        बुलढाणा, प्रतिनिधी: दहावी व बारावी विद्यार्थ्यांचे ग्रेस गुण अर्ज शासनाच्या आपले सरकार प्रणालीद्वारे केवळ ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्याबाबत क्रीडा आयुक्त सुचित केले आहे. जिल्ह्यातील सर्व खेळाडू, विद्यार्थी, माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी आपले सरकार पोर्टलवर या वर्षीपासून सवलत गुणांचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बि.एस.महानकर यांनी केले आहे.

सन 2023-24 पर्यंतची ग्रेस गुण प्रक्रिया काही मानवी उणीवांमुळे हे काम अचुक व दोषरहीत होणे क्लिष्ट होत होती व त्याचा फटका विद्यार्थ्यांना त्यांच्या गुण न मिळण्याने बसत होता. या प्रश्नावर तोडगा आणि सदर सवलत गुण प्रक्रिया निर्दोष करण्यासाठी, या वर्षीपासून म्हणजेच 2024-25 यावर्षापासून ग्रेस गुणांसाठी केली जाणारी प्रक्रिया शासनाच्या आपले सरकार पोर्टलद्वारे ऑनलाईन करण्यात आली आहे. तसेच सदर पोर्टलद्वारे सर्व अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडे सादर करण्याची सुविधा निर्माण करुन देण्यात आली आहे.

त्याअनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यातील सर्व खेळाडू विद्यार्थी / जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांनी आपले सरकार अॅपद्वारे या वर्षीपासून सवलत गुणांचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावयाचा आहे. त्यासंदर्भात कोणताही खेळाडू जिल्हा क्रीडा कार्यालय, बुलढाणा येथे ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करणार नाही व अशा प्रकारचा अर्ज जिल्हा क्रीडा कार्यालय, बुलढाणा यांचेकडून स्विकारल्या जाणार नाही याची नोंद बुलढाणा जिल्ह्यातील सर्व खेळाडू, विद्यार्थी, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 0000000

संबंधित पोस्ट

शिक्षकांच्या निवृत्ती वेतन योजनेत सुधारणेविषयी निर्णय लवकरच– उद्योग मंत्री उदय सामंत

गरजुंपर्यंत प्रभावीपणे लाभ पोहोचवावा-केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

vishwatmaklokswamivarta

समाजाच्या शेवटच्या घटकाच्या विकासासाठी प्रसारमाध्यमांची साथ आवश्यक – सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट राज्यस्तरीय वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती समितीच्या बैठकीचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

मॅग्नेट 2.0 प्रकल्पाद्वारे पणन विषयक गुंतवणूक, कृषिमालाचे मूल्यवर्धन व रोजगारवाढीस गती देणार – पणन मंत्री जयकुमार रावल

vishwatmaklokswamivarta

भारतीय मानवाधिकार संघटन च्या जिल्हाध्यक्षपदी प्रशांतभैया डोंगरदिवे

शहीद जवानांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिवादन*

vishwatmaklokswamivarta