कुंभ मेळा भारतीय महान संस्कृती आणि श्रध्देचे प्रतीक आहे. त्याचे महत्त्व केवळ आध्यात्मिकतेपुरते मर्यादित नाही, तर ते मानसिक स्वास्थ्य, आत्मचिंतन आणि सामूहिक उर्जेचा अनुभव घेण्याचे एक अद्वितीय व्यासपीठ आहे. लाखो श्रद्धाळू आणि साधक जेव्हा या मेळ्यात सहभागी होतात, तेव्हा ते त्यांच्या मन, बुध्दी आणि आत्म्याच्या शुद्धीच्या दिशेने वाटचाल करतात. या वर्षीचा महाकुंभ असल्याने, तो मानवाच्या मनावर अधिक सकारात्मक प्रभाव पाडणारा आहे.
आध्यात्मिक शांतता आणि मानसिक स्थैर्य:
कुंभ मेळ्याचे भक्तिमय वातावरण म्हणजे सकारात्मक ऊर्जा आणि आत्मिक शांततेचा स्रोत आहे. गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या संगमावर स्नान केल्याने आत्म्याची शुद्धी आणि पापांपासून मुक्ती मिळते, अशी श्रद्धा आहे. ही धार्मिक आस्था मनाला नकारात्मकतेपासून मुक्त करते आणि मानसिक शांतता आणि स्थैर्य प्रदान करते.
सामूहिक साधना आणि संघभावाची वृध्दी करणारा :
कुंभ मेळ्यात कोट्यवधी लोक सामूहिकपणे ध्यान, प्रार्थना आणि भक्तीत लीन होतात. या सामूहिक साधनेतून मिळणारी सकारात्मक ऊर्जा एक अद्वितीय मानसिक अनुभूती देते. अशा सोहळ्यांमध्ये सहभागी झाल्याने व्यक्तीला दैनंदिन जीवनातील ताणतणाव आणि चिंतांपासून मुक्ती मिळते. जीवनाला नवीन दिशा मिळते. उदाहरण बघायचे तर एका विदेशी चित्रकाराने सांगितले की, ते कुंभ मेळ्यात रंगांचा संगम पाहण्यासाठी आले होते, परंतु येथे आल्यानंतर येथील भक्ती, श्रद्धा, अनुष्ठान, संघटन, आपुलकी, सांस्कृतिक महानता यांमुळे ते प्रभावित झाले. त्यांनी भारतीय आध्यात्मिक मूल्ये जाणून घेतली आणि त्या मार्गावर चालण्यास सुरुवात केली. असे अनेक अनुभव कुंभ मेळ्यात बघायला मिळतात. हे सामूहिक उपासनेचे आणि संघ भावाचे सकारात्मक परिणाम आहेत.
आत्मविश्वास आणि मानसिक सुदृढता:
कुंभ मेळ्यात दररोज साधू-संत आणि विद्वानांचे प्रवचन असतात. सामूहिक अनुष्ठान, नामजप आदी अखंडपणे सुरू असत. यामुळे इथे येणाऱ्याचे मन स्थिर होण्यास मदत होते. संतांच्या जीवनदर्शन आणि आध्यात्मिक मार्गदर्शनाने व्यक्तीला जीवनातील समस्यांना सामोरे जाण्याची दिशा मिळते. व्यक्तीतील विवेक जागृत होतो. त्यामुळे जीवनातील गुंतागुंती समजून घेण्यासाठी आणि त्यावर सोपे उपाय शोधण्यासाठी प्रेरणा मिळते. श्रद्धा वाढल्यामुळे व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो. ज्यामुळे तो जीवनातील आव्हानांना सामोरे जाऊ शकतो.आत्मचिंतन आणि आत्मिक विकास:
कुंभ मेळ्याचा अनुभव व्यक्तीला आत्मचिंतन आणि आत्मिक विकासाच्या दिशेने प्रेरित करतो. व्यक्तीच्या अंतर्मुखतेत वाढ होऊन जीवनातील व्यापक दृष्टिकोन तयार होतो. हा मेळा केवळ धार्मिक नाही, तर मानव जीवनाचा उद्देश समजून घेण्यासाठी आणि आत्म्याच्या उन्नतीसाठी एक व्यासपीठ आहे. आत्मचिंतन हे मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे, आणि कुंभमेळा यासाठी एक अप्रतिम संधी प्रदान करतो. देश-विदेशातील उद्योजक, कलाकार, वैज्ञानिक इत्यादी येथे आत्मचिंतन करण्यासाठी येतात. येथे आल्यावर त्यांना जीवनात सकारात्मक बदलांचा अनुभव येतो.
संस्कृती आणि सामुदायिक एकतेचा आविष्कार:
कुंभ मेळा विविध संस्कृती आणि समाजातील लोकांना एकत्र आणतो. हा अनुभव मनाला व्यापक करणारा आहे. विविध भागांतून आलेल्या लोकांशी संवाद साधल्याने आणि सहभाग घेतल्याने व्यक्ती मानसिकदृष्ट्या सशक्त होते आणि सामाजिक जबाबदाऱ्यांबद्दल जागरूक होते. सर्व लोक आपापल्या जाती, धर्म, पद, संप्रदाय यापेक्षा केवळ हिंदु म्हणून कुंभमेळ्यात सहभागी होतात. त्यामुळे इथे भारतातील विविध संस्कृती आणि उपसना यांचा संगम अनुभवायला मिळतो. कुंभमेळा म्हणजे सामुदायिक एकतेचा आविष्कार म्हंटल्यास वावगे ठरणार नाही.
नैसर्गिक वातावरण आणि मानसिक स्वास्थ्य:
त्रिवेणी संगमाच्या तीरावर असलेल्या कुंभ मेळ्याचे नैसर्गिक वातावरण मनाला शांतता आणि आनंद देते. पाणी, डोंगर, आणि मोकळ्या आकाशात व्यतीत केलेला वेळ मानसिक समाधानाचा अनुभव देतो. या नैसर्गिक सौंदर्यामुळे व्यक्ती तणावमुक्त होतो आणि मानसिक ऊर्जा प्राप्त होते.
हे बघता कुंभ मेळा केवळ एक धार्मिक उत्सव नाही, तर तो मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी एक अद्वितीय पर्वणी आहे. येथील वातावरण, साधू-संतांचे मार्गदर्शन, आणि सामूहिक भक्ती इत्यादी व्यक्तीला मानसिक स्थिरता, शांतता आणि नवीन ऊर्जा प्रदान करतात. कुंभ मेळ्याचा अनुभव जीवनाला नवी दृष्टी, संतुलन आणि सकारात्मकता प्रदान करणारा एक प्रभावी मार्ग आहे. या कुंभमेळ्यातील मिळाली ऊर्जा टिकून राहण्यासाठी आणि मानवाचे मनःस्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी धर्मरक्षण होणे गरजेचे आहे. परंतु सध्या सर्वत्र हिंदु धर्मावर आघात होत आहेत. त्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आणि धर्म रक्षणासाठी संघटित प्रयत्न करणे आवश्यक आहे. याविषयीचे मार्गदर्शन करणारे प्रदर्शन हिंदू जनजागृती समितीतर्फे महाकुंभ क्षेत्री लावण्यात आले आहे.कैलाशपुरी भारद्वाज मार्ग चौक, भारद्वाज पोलीस ठाण्याच्या मागे, सेक्टर 6, कुंभ क्षेत्र, प्रयागराज येथे 10 जानेवारी 2025 ते 14 फेब्रुवारी 2025 दरम्यान, सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत आयोजित केले आहे.सर्व भक्तांनी आणि जिज्ञासूंनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या प्रदर्शनाला भेट देऊन, राष्ट्र आणि धर्माशी संबंधित शंकांचे निरसन करून घ्यावे.संकलक:सद्गुरू डॉ. चारुदत्त पिंगळेराष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदू जनजागृती समितीसंपर्क