vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

गव्‍हाच्‍या साठयावर निर्बंध; दर शुक्रवारी माहिती देणे अनिवार्य..

गव्‍हाच्‍या साठयावर निर्बंध; दर शुक्रवारी माहिती देणे अनिवार्य..

            छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी- केंद्रशासनाच्‍या अधिसुचनेअन्वये घाऊक व्‍यापारी/किरकोळ व्‍यापारी/ बिग चेन रिटेलर्स व प्रोसेसर्सकरीता गव्‍हाच्‍या साठ्यावर दि.३१ मार्चपर्यंत निर्बंध लागू केले आहेत. त्यासाठी प्रत्येकाकडे कमाल साठा किती असावा याचे प्रमाण ठरवून दिले असून दर शुक्रवारी आपल्याकडील साठ्याची माहिती संकेतस्थळावर प्रकट करणे अनिवार्य आहे,असे जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी कळविले आहे.

या अधिसुचनेनुसार, १. व्‍यापारी/घाऊक विक्रेता :- १००० टन, २.किरकोळ विक्रेता :- प्रत्‍येक आउटलेटसाठी ५ टन.,३.बिग चेन रिटेलर्स :- प्रत्‍येक आउटलेटसाठी ५ टन सर्व आउटलेटस आणि डेपोमध्ये जास्तीत जास्त स्टॉकची मात्रा (एकुण आउटलेटच्या ५ पट) टन व ४. प्रोसेसर्स :- ५०% मासिक स्थापित क्षमतेचे प्रमाण एप्रिल २०२५ पर्यंत उर्वरित महिन्यांनी गुणाकार केले, समान.

वरील प्रमाणे व्‍यापारी यांच्‍याकडे असणारा गव्‍हाचा साठा दि.११ डिसेंबर २०२४ च्‍या अधिसुचनेतील साठा निर्बंधापेक्षा जास्‍त असल्‍यास, तसे https://evegoils.nic.in/wsp.login या संकेतस्‍थळावर अधिसुचनेत ठरवून दिलेल्‍या साठ्याच्‍या मर्यादेपर्यंत गव्‍हाचा साठा कमी करणे आवश्‍यक राहील.तसेच केंद्र शासनाच्‍या पोर्टलवर गव्‍हाचा साठा नियमितप्रणे प्रकट करण्‍याबाबत शासनाने आदेशीत/ निर्देशीत केले आहे. त्‍याअनुषंगाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व घाऊक व्‍यापारी/किरकोळ व्‍यापारी/ बिग चेन रिटेलर्स व प्रोसेसर्स यांनी https://evegoils.nic.in/wsp.login या संकेतस्‍थळावर विहीत मुदतीत प्रकट करावा. त्यानंतर याच संकेत स्‍थळावर दर शुक्रवारी साठा बाबतची माहिती नोंद करणे आवश्‍यक/अनिवार्य आहे.

 जिल्ह्यातील सर्व गहू व्यापाऱ्यांच्या आस्‍थापना, ज्या गहु साठा पोर्टलवर नोंदित नाहीत त्यांची नोंदणी करणे. पोर्टलवर एकदा साठा नोंद केल्यानंतर त्यामध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा नाही त्यामुळे व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडील गव्‍हाचा साठा (दर शुक्रवारी) उपभोक्‍ताविभागाच्‍या https://evegoils.nic.in/wsp.login या संकेतस्‍थळावर नोंदणी करून अपलोड करावा. शासनाने ठरवुन दिलेल्‍या निर्बंधापेक्षा गव्‍हाचा साठा जास्‍त आढळून आल्‍यास व साठेबाजी करणाऱ्या संबंधीत व्यापाऱ्यांविरूद्ध जीवनावश्‍यक वस्‍तू अधिनियम १९५५ अन्‍वये कडक कारवाई करण्‍यात येईल,असे जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी कळविले आहे.०००००

संबंधित पोस्ट

कोयना दौलत डोंगरी महोत्सवाची जोरदार तयारी सुरु*

साताऱ्यात उत्पादक संस्थांच्या सक्षमीकरणासाठी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

vishwatmaklokswamivarta

विशेष भारत निवडणूक आयोगाकडून ३३४ पक्षांची नोंदणी रद्द

लाडकी बहिण योजनेतील लाभार्थ्यांची जिल्हास्तरीय सहकारी पतसंस्था स्थापन*राज्यातील पहिल्या पतसंस्थेला नोंदणी प्रमाणपत्र प्रदान

vishwatmaklokswamivarta

हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

vishwatmaklokswamivarta

शांतिनिकेतन नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश!आपला पाल्य स्वतःच्या पायावर उभा राहिला यापेक्षा पालकांना दुसरा आनंद नसतो – भास्करराव अंबेकर

vishwatmaklokswamivarta