आपली प्रगती कशात आहे ते शोधा आणि राष्ट्राच्या प्रवाहात जाती-जातीत वाद होणार नाही याची दक्षता घ्या : अॅड. ब्रम्हानंद चव्हाण यांचे प्रतिपादन
राज्य प्रतिनिधी पुढील शैक्षणिक जिवनात अभ्यास करीत असतांना प्रत्येकाने आपली प्रगती कशात आहे हे शोधले पाहिजे आणि राष्ट्राच्या प्रवाहात काम करीत असतांना जाती-जातीत वाद होणार नाही याची दक्षता घ्या, जातीय सलोखा राखा तरच देशाची प्रगती आहे आणि ही प्रगती करण्याची ताकद राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांमध्ये आहे असे प्रतिपादन महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालयाचे संचालक अॅड. ब्रम्हनंद चव्हाण यांनी केले आहे.
जालना तालुक्यातील इंदेवाडी येथे महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या 7 दिवसीय शिबीराचे उद्घाटन गुरुवार दि. 13 फेब्रुवारी 2025 रोजी पार पडले. यावेळी ते बोलत होते. या शिबीराचे उद्घाटन प्राचार्य डॉ. प्रसाद मदन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. प्रशांतकुमार वनंजे यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. सोमीनाथ खाडे, बद्रीनाथ गोंगे, सरपंच लक्ष्मी सर्जेराव शिंदे, उप सरपंच गिरीजाबाई नामदे, सदस्य सुमित वाघमारे, सिरसाट यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना अॅड. ब्रम्हनंद चव्हाण म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी हे देश घडविणारे असतात. त्यांनी जात, धर्म, पंथ या पलिकडे जावून जावून प्रत्येक समाजाला आणि समाजातल्या प्रत्येकाला राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी हे हवे-हवेसे वाटले पाहिजेत, त्या दिशेने वाटचाल करा असे आवाहन अॅड. चव्हाण यांनी केले. यावेळी त्यांनी संघर्ष करुन एक समतोल शिक्षण व्यवस्था आणि दर्जेदार शिक्षण व्यवस्था उपलब्ध करुन देत त्या माध्यमातनू उत्कृष्ठ विद्यार्थी घडविल्याचेही सांगीतले. त्यामुळे महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालयाला नॅक कडून बी दर्जा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी बी. गवळी, प्रा. एस. आर. कहाळे, प्रा. आर. एन. हिवराळे, विद्यार्थी प्रतिनिधी अविनाश खरात, निकिता रत्नपारखे यांच्यासह महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शिबीराच्या कार्यक्रमाचे आभार पी.टी. शिंदे यांनी मानले.
युवकांच्या सहभागाशिवाय देशाचा विकास नाही – प्राचार्य डॉ. प्रसाद मदन,देशाचा विकास हा देशीतील युवकांच्या हाती आहे. जोपर्यत युकांचा सहभाग वाढत नाही तोपर्यत देशाचा विकास शक्य नाही असे प्राचार्य डॉ. प्रसाद मदन यांनी म्हटले. त्यामुळे प्रत्येक युवकाने स्वतःचे आत्मपरीक्षण करायला हवे, अंतर्गत शक्ती जागृत करायला हवी, आणि ती शक्ती ज्यावेळी जागृत होते, त्या वेळी देशाच्या नव्हे तर जगाच्या कोणत्याही कोपर्यात सहज पोहोचता येते, आणि तेच साध्य करण्याची ताकद राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यामध्ये असते असेही प्राचार्य डॉ. मदन यांनी म्हटले आहे.
आपले एक ध्येय निश्चित करा आणि त्यासाठी वेळ राखून ठेवा – प्रा. डॉ. सोमीनाथ खाडेएखाद्याच्या आयुष्यात ध्येय नसेल तर त्याचे आयुष्य हे होकायंत्र नसलेल्या जहाजासारखे दिशाहीन असते. आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्याची दिशा ठरवायची असेल त्यांनी आपले ध्येय निश्चित केले पाहिजे आणि त्या ध्येयासाठी वेळ राखून ठेवला पाहिजे असे प्रतिपादन प्रा. डॉ. सोमीनाथ खाडे यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना स्वतःच्या आयुष्याला सिध्द करण्यासाठी ध्येय निश्चित करण्याचे आवाहन केले. दरम्यान ज्या ठिकाणी काहीच मिळत नाही, त्या ठिकाणी वेळ वाया घालवू नका, मोबाईलच्या आहारी जावू नका, त्या एैवजी स्वतःच्या मनाचे डेव्हलोपमेंट करा, मनाचे डेव्हलोपमेट केल्यास जगातली प्रत्येक गोष्ट जिंकता येते असा मौलीक सल्लाही प्रा. डॉ. सोमीनाथ खाडे यांनी दिलाय.