vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्मप्रदेश

योगेश नगर येथे श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताह; भक्तीमय वातावरणात ह.भ.प. भागवत महाराज काळबांडे यांचे कथा प्रवचन

योगेश नगर येथे श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताह; भक्तीमय वातावरणात ह.भ.प. भागवत महाराज काळबांडे यांचे कथा प्रवचन

 

जालना प्रतिनिधी –

शहरातील अंबड रोडवरील योगेश नगर येथे दि. 13 फेब्रुवारी 2025 पासून श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताह सुरु करण्यात आला आहे. ह.भ.प. भागवत महाराज काळबांडे हे रोज भक्तीमय वातावरणात कथा प्रवचन देत आहेत. या सप्ताहाची सांगता दि. 20 फेब्रुवारी 2025 रोजी होणार असून या दिवशी आमदार अर्जुनराव खोतकर यांचा सत्कार सोहळा देखील होणार आहे अशी मागणी संस्थापकीय अध्यक्ष सुधाकर सोनार यांनी रविवार दि. 16 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 4 वाजता दिली.

अशोक महाराज पाथ्रुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश नगर येथे श्री गजानन महाराज मंदीर संस्थानच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात दैनंदीत धार्मिक कार्यक्रम होत आहेत. यामध्ये दि. 13 फेब्रुवारी 2025 रोजी श्री. ह.भ.प. महंत महादेव महाराज गिरी यांचे किर्तन झाले. तर दि. 14 फेब्रुवारी रोजी श्री. ह.भ.प. एकनाथ महाराज जाधव यांचे, दि. 15 फेब्रुवारी रोजी श्री. ह.भ.प. अ‍ॅड. समाधान महाराज लोखंडे, दि. 16 फेब्रुवारी रोजी श्री. ह.भ.प. भागवत महाराज नखाते यांचे किर्तन झाले असून दि. 17 फेब्रुवारी 2025 रोजी ह.भ.प. कु. योगीताताई देवकर, दि. 18 फेब्रुवारी 2025 रोजी ह.भ.प. सौ. शारदाताई महाराज मापारी, दि. 19 फेब्रुवारी 2025 रोजी ह.भ.प. पंकज महाराज थोरे यांचे किर्तन होणार आहे.

रोज दुपारी 1 ते 5 वाजेपर्यत ह.भ.प. भागवत महाराज काळबांडे यांचे श्रीमद् भागवत कथा होत आहे. या श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताहासाठी संस्थापकीय अध्यक्ष सुधाकर सोनार, इंजि. पदमाकर काटकर, अविनाश खांडेकर,चंद्रभान खांडेकर, विजय लोणकर, अ‍ॅड. महादेव साखरे, अशोक पवळ, पद्माकर काकडे, हरीभाऊ गजर, रविंद्र रामदासी, फकीरा वाघ हे परिश्रम घेत आहेत. या सप्ताहाची सांगता दि. 20 फेब्रुवारी 2025 रोजी होणार असून आमदार अर्जुनराव खोतकर यांचा त्याच दिवशी सत्कार सोहळा होणार असून या कार्यक्रमाला ह. भ. प. नानासाहेब देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

संबंधित पोस्ट

संत ज्ञानेश्वर महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे *पालखी सोहळा सुखकर आणि सुरक्षित पार पडण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे–विभागीय आयुक्त शितल तेली-उगले*

आता लाडकी बहीण योजनेसाठी आधार प्रमाणीकरण…

vishwatmaklokswamivarta

मराठा समाजाशी संबंधित निर्णयांमध्ये तातडीनं दुरुस्ती करावी, अन्यथा आगामी निवडणुकांमध्ये भाजपाला धडा शिकवू, असा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील

पाटण शहरातील रस्त्याचे काम दोन महिन्यात पूर्ण करा; पालकमंत्री शंभूराज देसाईंचे आदेश

विकास लवांडे यांना तात्काळ अटक करा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी**वारकरी संप्रदायातील लोकांना ‘घुसखोर’ ठरवण्याचा अधिकार विकास लवांडे आणि राष्ट्रवादीला कुणी दिला ?* – हिंदु जनजागृती समिती

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे जिल्ह्यात भक्तीमय वातावरणात आगमन..