vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीत होर्डिंग्जवर कारवाई….

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीत होर्डिंग्जवर कारवाई….

प्रतिनिधी : येत्या 4 दिवस कोकणातील ठाण्यासह चारही जिल्ह्यात हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या तौक्ते चक्रीवादळामूळे कल्याण डोंबिवलीत रस्त्यावर उभारण्यात आलेली 3 भलीमोठी होर्डींग कोसळून काही जण जखमी झाले होते.

या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीच्या काळातही अशा दुर्घटना होऊ नये यासाठी धोकादायक असणारी सर्व होर्डिंग्ज त्वरित काढून टाकण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. तसेच अतिवृष्टीच्या काळात धोकादायक इमारतीही तातडीने रिकाम्या करण्याचे निर्देश सर्व प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना दिले.

रुग्णालयांना जनरेटरसाठी अतिवृष्टीच्या काळात 3 दिवस पुरेल इतका डिझेलचा साठा करण्याबाबतच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तसेच गोविंदवाडीसारख्या अतिसखल भागात अतिवृष्टीच्या काळात पाणी शिरण्याआधीच तेथील तबेले रिकामे करून गुरांची बाहेरील बाजूस आणि रहिवाशांची संक्रमण शिबिरात व्यवस्था करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या आहेत.

नागरिकांनी देखील या अतिवृष्टीच्या वेळेत घराबाहेर जाणं टाकळं पाहिजे. झाडे, कमकुवत इमारती आणि धोकादायक ठिकाणी अडोसा घेऊन उभे राहू नये.

संबंधित पोस्ट

धारावीत २७ फेब्रुवारी २६ रोजी गुड शेफर्ड इंग्लिश स्कूल या ठिकाणी मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहाने साजरा

vishwatmaklokswamivarta

सातारा जिल्ह्याला निर्भीड पत्रकारितेची मोठी परंपरा पालकमंत्री शंभूराज देसाई

यंदा लोणार पर्यटन महोत्सव होणार पर्यटन मंत्री यांची माहिती

vishwatmaklokswamivarta

मुंबईला पाणीपुरवठा करणारा ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील तानसा धरण आज सायंकाळी ओसंडून वाहू लागले…

जालना जिल्ह्यातील बदनापूर कृषी संशोधन केंद्रास सर्व अर्थसहाय्य- कृषी मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे

मुंबईत 6 मुलांच्या कोरोना लसीची यशस्वी चाचणी

vishwatmaklokswamivarta