vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

आरोग्य विभागामार्फत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) नोंदणी

आरोग्य विभागामार्फत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) नोंदणी

 

          नवी मुंबई प्रतिनिधी -राज्य शासनाची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना दि. २ जुलै, २०१२ पासून राज्यात राबविण्यात येत आहे, तर आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही केंद्र शासनाची आरोग्य विमा योजना असून दि. २३ सप्टेंबर, २०१८ पासून राज्यात लागू करण्यात आली. दिनांक २६ फेब्रुवारी, २०१९ च्या शासन निर्णयान्वये आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेशी सांगड घालून दोन्ही योजना राज्यात एकत्रितपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सुधारीत योजनेची दि. ०१.०४.२०२० पासून राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे

  सध्या आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत (PMJAY) आरोग्य संरक्षण प्रति कुटुंब प्रति वर्ष रु.५ लक्ष एवढे आहे तर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत (MJPJAY) आरोग्य संरक्षण प्रति कुटुंब प्रति वर्ष रु. १.५ लक्ष एवढे आहे. आता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गतही आरोग्य संरक्षण प्रति कुटुंब प्रति वर्ष रु.५ लक्ष एवढे करण्यात येत आहे

    आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन अरोग्य योजनेचे लाभाथी घटक – सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणनेत (SECC) नोंदीत समाविष्ट कुटुंबे, अंत्योदय अन्न योजनेतील कुटुंबे तसेच याशिवाय राज्य शासनाने शिफारस केल्यानुसार केंद्र शासनाने निश्चित केलेली कुटुंबे हे आहेत. राज्यातील कुटुंबे प्रथमत: राज्य शासनाच्या निर्देश नुसार पिवळे व केशरी रेशन कार्डधारक लाभार्थी यांचे आयुष्यमान कार्ड काढण्यात येत आहे. आतापर्यंत नमुंमपा अंतर्गत एकूण 41640 आयुष्यमान कार्ड आरोग्य कर्मचारी यांच्या मार्फत काढण्यात आले आहेत.

 महापालिका आयुक्त्‍ यांनी नवी मुंबई शहरातील नागरीकांना PMJAY व MJPJAY या योजने अंतर्गत रु. 5 लक्ष प्रति कुटुंब प्रति वर्षासाठी आरोग्य विमा लाभ घेण्याकरीता आयुष्यमान कार्ड/MJPJAY कार्ड तयार करून घेण्याकरीता शासनाचे संकेतस्थळ https://setu.pmjay.gov.in/setu/ व https://beneficiary.nha.gov.in वर नोंदणी करणेसाठी आवाहन केले आहें अथवा पात्र लाभार्थी यांनी जवळचा ना.प्रा.आ.केंद्र येथे जावून आयुष्यमान कार्ड काढून घेण्यात यावे.

0000000

संबंधित पोस्ट

माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाला बुलढाण्यात उत्स्फूर्त प्रतिसाद;जिल्ह्यातील 870 ग्रामपंचायतींचा सक्रिय सहभाग

हिंद-की-चादर’ शताब्दी समागमासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज*लाखो भाविकांसाठी 15 दिवस व्यापक आणि मोफत वैद्यकीय सेवा..

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून जपले जातेय घरेलू कामगार महिलांचे आरोग्यलाभार्थींनी मानले राज्य शासन, आरोग्य यंत्रणेसह प्रशासनाचे आभार…

किनगाव येथे मेंदूविकार तपासणी शिबिर संपन्न; ७६ दिव्यांगांवर झाले उपचार !लातूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य व दिव्यांग सक्षमीकरण विभागाचा स्तुत्य उपक्रम!

vishwatmaklokswamivarta

स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी कायद्यात आवश्यक सुधारणा करणार- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालय येथे जागतिक सिकलसेल आजार नियंत्रण दिन उत्साहात साजरा