vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत ठाणे जिल्ह्याचे यश..

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत ठाणे जिल्ह्याचे यश..

 

ठाणे प्रतिनिधी(जिल्हा परिषद, ठाणे)- विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, या उद्देशाने भारत सरकारच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालय सुरु करण्यात आली आहेत. या विद्यालयात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सी. बी. एस. सी. ई पॅटर्न च्या धर्तीवर बारावीपर्यंत मोफत शिक्षण दिले जाते. तर‌ संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण‌ भागातील विद्यार्थ्यांच्या ३० जागांपैकी शहापूर तालुक्यातील – २१ पात्र विद्यार्थी, मुरबाड तालुक्यातील – ०१ पात्र विद्यार्थी, भिवंडी तालुक्यातील- ०१ पात्र विद्यार्थी असे एकूण – २३ पात्र विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत ३० जागांपैकी २३ जागेवर पात्र विद्यार्थ्यांची निवड झाली आणि शहापूर तालुक्यातील २१ विद्यार्थ्यांची निवड झाली ही आनंदाची बाब आहे. या सर्व विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी दिल्या आहेत.

  ठाणे व पालघर जिल्ह्यासाठी नवोदय विद्यालयात इयत्ता ६ वी च्या एकूण ८० जागा आहेत. त्यापैकी ६० जागा ग्रामीण भागासाठी व २० जागा शहरी भागासाठी असतात. यात ठाणे जिल्ह्यासाठी ग्रामीण भागासाठी ३० जागा व शहरी भागासाठी १० जागा राखीव असतात. संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ३० जागांपैकी २३ पात्र विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

    सर्व यशस्वी विद्यार्थी, पालक, मार्गदर्शक शिक्षक, मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी (शिक्षण), गटशिक्षाधिकारी या सर्वांना शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

000

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका खास मुलाखतीत स्पष्ट केलं की, मुंबईचा पुढील महापौर महाराष्ट्रातील महायुतीचाच असेल आणि तो हिंदू व मराठीच …

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत श्री काळाराम मंदिरात धर्मध्वज उभारणी सोहळा संपन्न..

पॉश” ची अंमलबजावणी न करणाऱ्या राज्यातील 672 कार्यालयांना कारणे दाखवा नोटीसा

दहावी, बारावी विद्यार्थ्यांची हॉल तिकीटासाठी अडवणूक न करण्याचे शाळा व्यवस्थापनांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी: माटुंगा ते मुलुंड दरम्यान रविवारी मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक ..

नियतकालीक श्रमशक्ती सर्वेक्षण (PLFS) व असंघटित क्षेत्रातील उद्यमांचे वर्षिक सर्वेक्षण (ASUSE) 2026 करीता जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे प्रगणकांना अचूक माहिती देणेचे आवाहन