vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ग्रंथालय प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी ऑनलाइन प्रणाली विकसित करावी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश..

ग्रंथालय प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी ऑनलाइन प्रणाली विकसित करावी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश..

मुंबई, प्रतिनिधी:- ग्रंथालय प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक होण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा. पात्र ग्रंथालयांच्या वर्गबदल प्रक्रियेसाठी ऑनलाइन प्रणाली विकसित करावी असे, निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात ग्रंथालय संचालनालयाच्यावतीने सविस्तर सादरीकरण करण्यात आले. या बैठकीस ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे यांच्यासह ग्रंथालय विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ग्रंथालय श्रेणीकरणाचे निकष स्पष्ट करताना ‘ड’ वर्गातून ‘क’ वर्गात रूपांतरासाठी किमान १००१ ग्रंथ संख्या , तर ‘क’ वर्गातून ‘ब’ वर्गात जाण्यासाठी किमान ५००१ ग्रंथ संख्या आणि ‘ ब ‘ वर्गातून ‘अ ‘ वर्गात रुपांतरासाठी 15001 ग्रंथ संख्या आवश्यक आहे. राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या प्रस्तावित इमारतीसह अधिनस्त कार्यालयांच्या प्रलंबित बाबींवरही बैठकीत चर्चा झाली‘ग्रंथालयांचे आधुनिकीकरण आणि सुलभता यावर भर द्यावा. ऑनलाइन प्रणाली विकसित केली तर ग्रंथालय सेवांचा लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल, असेही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.

सादरीकरणातच्या माध्यमातून ग्रंथालय व्यवस्थापन प्रणाली, अनुदान प्रणाली, विभागीय व जिल्हास्तरीय ग्रंथालयांचे कार्य, ग्रंथालय समित्या आणि नवीन ग्रंथ धोरण यावर सविस्तर चर्चा झाली.

00000

संबंधित पोस्ट

मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम मतदारांच्या सुविधेसाठी विधानसभा मतदारसंघनिहाय मदत कक्ष व संपर्क क्रमांकांची घोषणा

जाफराबाद, भोकरदन, घनसावंगी -अंबड, बदनापूर, जालना येथील आंदोलन-एसटीच्या तिकीट दर वाढीच्या निषेधार्थ जिल्हाभरात शिवसेनेच्या वतीनेचक्काजाम व निदर्शने…

vishwatmaklokswamivarta

खरीप पीकस्पर्धा जाहीर; अर्जाची मुदत 10 ऑगस्टv अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

इतर मागासवर्गीय समाजातील गरजू व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज योजना 

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना; भूमिहीन अनुसूचित जाती व नवबौद्ध कुटुंबांना १०० टक्के अनुदानावर शेतजमीन..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नवी मुंबई, वाशी येथील सिडको ऑडिटोरियम येथे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित “नशामुक्त नवी मुंबई” अभियानाचे उद्घाटन संपन्न