जाफराबाद, भोकरदन, घनसावंगी -अंबड, बदनापूर, जालना येथील आंदोलन-एसटीच्या तिकीट दर वाढीच्या निषेधार्थ जिल्हाभरात शिवसेनेच्या वतीनेचक्काजाम व निदर्शने…
जालना, (प्रतिनिधी)- नुकतीच शासनाच्या वतीने एसटी महामंडळाच्या प्रवास भाड्यात १५ टक्क्यांनी मोठी वाढ केली. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यात सर्वत्र सामान्य नागरिक तीव्र संतप्त झाला. शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व तालुक्यात चक्काजाम व निदर्शने करुन केलेली दरवाढ तात्काळ मागे घेण्याची जोरदार मागणीकरण्यात आली.
अगोदरच सर्वसामान्य नागरिक महागाईने होरपळला असून त्यात विधानसभा-लोकसभानिवडणुका झाल्यानंतर शासनाने अत्यंत स्वार्थी हेतूने एकीकडे महिलांना मोफत प्रवास म्हणत दुसरीकडे मात्र १५ टक्क्यांची मोठी दरवाढ केली.त्यामुळे गोर-गरीबांचे हक्काचे वाहन असणार्या एसटीचा प्रवास महाग झाला आहे. सरकारच्या स्वार्थी धोरणामुळे गोर-गरीबांसह सर्वच महागाईने हतबल झाले आहे. एकीकडे निवडणुकीत महागाई कमी करु, अशा घोषणा करणार्या महायुती सरकारने जबरदस्त भाव वाढ करुन जनतेच्या तोंडाचे पाणी पळविले आहे. जालना शहरासह सर्व तालुक्यात शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी रस्त्यावर उतरुन प्रचंड घोषणाबाजी करीत केलेल्या दरवाढीचा धिक्कार केला असून ही दरवाढ तात्काळ मागे न घेतल्यास मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन उभारण्याचा इशाराही दिला आहे.जालना येथील बसस्थानकावर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबुराव पवार, मुरलीधर शेजुळ, तालुकाप्रमुख हरिहर शिंदे, शहरप्रमुख बालापरदेशी, घनश्याम खाकीवाले, दुर्गेश काठोठीवाले, महिला आघाडीच्या प्रमुख मंगलताई मेटकर, माजी सभापती मुरलीआबा थेटे, माजी नगरसेवक विजय पवार,संदीप नाईकवाडे, रविकांत जगधने, माजी नगरसेवक जे.के.चव्हाण, जनर्धन झोरे, ऋषी खिरे, राजेश शेळके, दर्शन चौधरी, शिवा मुळे, जीवन खंडागळे, सुनील तोडकर,वसीम खान, गुड्डू खान, सखावत पठाण, अजय रोडिये, गणेश लाहोटी, विठ्ठल पाऊलबद्धे, रामेश्वर बाहेकर, दुर्गेश शिंदे, योगेश जाधव, सोनाजी खांडेभराड, शुभम चव्हाण, तुकाराम भुतेकर, सावता तिडके, रामेश्वर कूरिल यांच्यासह आदींची उपस्थिती होती.भोकरदनमध्ये शिवसेना शहर प्रमुख महेश पुरोहित, उपशहर प्रमुख संतोष सुरडकर, युवा सेना शहर संघटक प्रदीप पैठणकर, बाळू जाधव, सुदाम जाधव, अण्णा सुरडकर, उखर्डू आकसे, सुनील खेडेकर, सय्यद नासिर, संदीप लाड,रत्नदीप सातदिवे, स्वप्निल लवंगे, गजानन जाधव, शेख नियाज, साहेबराव कड,राहुल पगारे, स्वप्निल बोर्डे ,राजू शेळके, परमेश्वर हातोळे ,पिराजीजाधव, शेख सत्तार, कृष्णा तराळ, आकाश हिवाळे, सुधाकर दळवी, तुकाराम दळवी,यांच्यासह इतर शिवसैनिक उपस्थित होते. तर घनसावंगी येथे तालुकाप्रमुख संदिप कंटुले, शंतनु देशमुख, यादव देशमुख, बबनराव घोगरे, गणेशराव काळे,रमेश कंटुले, भरतं मुळें, राजु तांगडे, गोपाल तांगडे, अंकुश कंटुले,दिलीप कंटुले, बाळु काळे यांच्यासह शिवसैनिकांची उपस्थिती होती.तसेच बदनापूर येथे जिल्हा संघटक भानुदासराव घुगे, उपजिल्हाप्रमुखभगवानराव कदम, परमेश्वर चंद, राजू जाधव, जावेद खान, केशव क्षीरसागर,अंकुश वाघ, दत्तू पाटील गारखेडे, ज्ञानेश्वर गरबाडे, बाबुराव बोडके, भरत मदन, कारभारी मसलेकर, सुदाम काळे, अर्जुन चव्हाण, श्रीराम कान्हेरे,राहुल जर्हाड, बालाजी चव्हाण, दत्ता पडोळ, रंगनाथ वाघ, सुभाष मदन,ज्ञानेश्वर पुंगळे, काकासाहेब ढाकणे, लक्ष्मण साळवे, सुहास इंदानी,रंगनाथ कदम, श्रीमंत जर्हाड, भास्कर चव्हाण यांच्यासह अधिसूसैनिकांचीउपस्थिती होती.अंबड येथे उपजिल्हाप्रमुख हनुमान धांडे,तालुकाप्रमुख अशोक बर्डे,तालुकासंघटक दिनेश काकडे, कुमार रुपवते,नंदकिशोर पुंड,राम लांडे,कल्याणटकले,जगन दुर्गे,रमेश वराडे,सुरेश राजपूत यांच्या स्वाक्षर्या आहेत. तरजाफराबाद येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपजिल्हाप्रमुख रमेश गव्हाड,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उत्तमराव वानखेडे, तालुकाप्रमुख कुंडलिक मुठ्ठे,माजी ताुकाध्यक्ष बजरंग बोरसे, शिवाजीराव गावंदे, बजरंगबोरसे,शहरप्रमुख देवीसिंह बायस,माजी पं.स. सदस्य रमेश गायकवाड, तालुका युवा अधिकारी देविदास सवडे,जेष्ठ शिवसैनिक विष्णू म्हस्के, हरिश्चंद्रम्हस्के,शिवाजी म्हस्के,परमेश्वर सरोदे,विठ्ठल खपुटे,रामेश्वरखांडेभराड,शेख इरफान, अश्पाक कुरेशी, मोहम्मद फैसल,समीर शहा,समाधानकाकडे, बाबुराव मुळे,गणपत बनकर, प्रल्हाद बनकर,रवींद्र कदम, संतोष जाधव,एकनाथ परिहार, अरुण काकडे, गोविंदा माकोडे,अमोल नरवडे,दिगंबर जाधव,विनायक जाधवसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.