vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे जालना शहरात प्रचंड वाहतूक कोंडी;जनतेला होणारा मनस्ताप तात्काळ दूर करा – माजी नगराध्यक्ष भास्कररावअंबेकर

प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे जालना शहरात प्रचंड वाहतूक कोंडी;जनतेला होणारा मनस्ताप तात्काळ दूर करा – माजी नगराध्यक्ष भास्कररावअंबेकर

 

जालना, प्रतिनिधी : जालना शहरात प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे सध्यामोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहनकरावा लागत आहे. शहरातील काद्राबाद, बडी सडक तसेच विविध गल्ल्यांमधीलवाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर तात्काळउपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना संपर्कप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी केली आहे.अंबड चौफुली ते मंठा चौफुली या मार्गावरील उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे कामआणि पुढे कुंडलिका नदीवरील रोहणवाडी रस्त्यावरील नवीन पुलाच्या बांधकामामुळे हा मुख्य मार्ग गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. नदीवरीलपुलाच्या कामासाठी तयार करण्यात आलेला लाखो रुपये खर्चाचा वळण रस्तापहिल्याच पावसात वाहून गेल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.या मार्गावरील वाहतूक नेमकी कोणत्या पर्यायी मार्गाने वळवायची याचेकोणतेही नियोजन प्रशासनाने केलेले नाही. त्याचबरोबर हनुमान घाट, मुर्गीतलाव परिसर तसेच काही दिवसांपूर्वी काद्राबाद झेंडा परिसरातही रस्त्यांची खोदाई करण्यात आल्याने शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे.शहरात वारंवार निर्माण होणारी वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांची यंत्रणा देखील प्रभावीपणे कार्यरत दिसत नसल्याची टीकाभास्करराव अंबेकर यांनी केली. अनेक ठिकाणी नाल्यांवरील ढापे तुटलेल्याअवस्थेत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.शहरातील नागरिकांना या वाहतूक कोंडीच्या मनस्तापातून मुक्त करण्यासाठीप्रशासनाने तातडीने वाहतूक नियोजन करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशीमागणी माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना संपर्कप्रमुख भास्करराव अंबेकर यांनीप्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केली आहे.

संबंधित पोस्ट

ठाण्यात सायकल राईडमधून एचआयव्ही-एड्स जनजागृतीचा संदेश!

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६लातूर जिल्ह्यात १ हजार ७४७ केंद्रांवर शनिवारी मतदान; प्रशासनाची तयारी पूर्ण-· मतदान पथके रवाना; ८ हजार ४१४ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश· जिल्हा परिषदेसाठी २४२, तर पंचायत समित्यांसाठी ४१९ उमेदवार निवडणूक रिंगणात-· मतदान यंत्रावर जिल्हा परिषदसाठी पांढऱ्या, पंचायत समितीसाठी गुलाबी मतपत्रिका

vishwatmaklokswamivarta

छत्तीसगडमध्ये नक्षलविरोधी मोहिमेला मोठं यश! बिजापूरच्या नेशनल पार्क जंगलात झालेल्या चकमकीत 1 कोटींचं बक्षीस असलेला नक्षल कमांडर सुधाकर ठार.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम : सुशिक्षित बेरोजगारांसाठी उद्योग उभारणीची सुवर्णसंधी

सामाजिक न्याय विभागाचा आज राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा-सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील बीकेसी येथे २ ते १४ मे दरम्यान महालक्ष्मी सरस चे आयोजन महिला उद्योजिकांसाठी भव्य उपक्रम