vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

श्रीगणेश म्हणून सुपारीची पूजा का केली जाते..?

श्रीगणेश म्हणून सुपारीची पूजा का केली जाते..?

अध्यात्मिक वार्ता-

कोणत्याही शुभकार्यात गणेशाला प्रथम पूजेचा मान आहे. गणपती म्हणून सुपारीची प्रतिष्ठापना करून त्याची पूजा केली जाते. असे करण्यामागे स्मृतिग्रंथात काही उल्लेख आढळतात. या ग्रंथात म्हटल्याप्रमाणे सुपारी हे पूर्ण फळ आहे. कुठल्याही प्रकारची पोकळी नसलेले हे फळ आहे.

प्राचीन काळी सत्य युगात ऋषी-मुनी आपल्या साधनेने देवांचे ध्यान करून त्यांना आवाहन करत असत. त्या तपश्चर्येमुळे देव प्रकट व्हायचे. मात्र, कलियुगात हे शक्य नाही. मनुष्याला पूर्वीप्रमाणे आराधना करणे शक्य नसल्याने कुठल्याही पूर्ण फळाची प्रतिष्ठापना केल्यास त्यात देवता वास करेल,

असे पुराणात सांगितले आहे. त्यामुळे तांदळाच्या राशीवर सोळा उपचाराने सुपारीचे पूजन केल्यास त्यामध्ये देवता वास करते, असा विश्वास आहे. तांदूळ हे देवाचे अन्न असल्याने ते पवित्र मानले जाते.

कुठल्याही शुभकार्याप्रसंगी, पूजेच्या वेळी तांदळाच्या राशीवर सुपारीची प्रतिष्ठापना केली जाते. त्या सुपारीला ध्यान, आवाहन, आसन अर्घ्य, पंचामृत स्नान, गंधोदक स्नान, सुमंगलस्नान, पुष्पस्नान, हिरण्यस्नान, शुद्धोदक स्नान या पद्धतीने त्या सुपारीवर उपचार करून, सुपारीची प्रतिष्ठापना केली जाते.

तसेच मंत्रोच्चाराने त्या देवतेला बोलावले जाते. त्या आराधनेच्या बळावर त्या पूजेत आपला लाडका बाप्पा सुपारीच्या रूपात तेथे हजेरी लावतो.

000000

सुशील स्वामी जेगम गुरुजी

संभाजी नगर

संबंधित पोस्ट

महाशिवरात्रीचे महत्त्व आणि शिवाच्या उपासनेमागील शास्त्र …

vishwatmaklokswamivarta

आजपासून देशभरात शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात, राज्यात कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि वणी या साडेतीन शक्तिपीठांमध्ये उत्सवाचा प्रारंभ, पहिल्या दिवशी शैलपुत्री या रुपाची होत आहे आराधना.

vishwatmaklokswamivarta

दत्त माहात्म्य

vishwatmaklokswamivarta

आज मुंबईत महाशिवरात्रीनिमित्त भव्य उत्सवाचे आयोजन..

vishwatmaklokswamivarta

सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिनानिमित्त बुलढाणा शहरातून भव्य शोभायात्रा

जपमाळ याविषयी काही महत्वपूर्ण माहिती