vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ऑटोरिक्षा चालकाद्वारे मोटार वाहन नियमांचे उल्लंघन करून गुन्हा केल्यास-ऑटोरिक्षा चालकांविरुद्ध ऑनलाईन तक्रार करण्यासाठी व्हॉट्सॲप क्रमांक जाहीर..

ऑटोरिक्षा चालकाद्वारे मोटार वाहन नियमांचे उल्लंघन करून गुन्हा केल्यास-ऑटोरिक्षा चालकांविरुद्ध ऑनलाईन तक्रार करण्यासाठी व्हॉट्सॲप क्रमांक जाहीर..

ठाणे, प्रतिनिधी:- मुंबई महानगरक्षेत्र परिवहन प्राधिकरण यांच्या दि.23 जानेवारी 2025 रोजी झालेल्या बैठकीत ऑटोरिक्षाकरिता (सी.एन.जी.) 1.5 कि.मी. करिता किमान 26/-रु. प्रमाणे भाडेदरात वाढ करण्यास मान्यता दिली आहे. या मीटर भाडेदराच्या अनुषंगाने, या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व शेअर-ए-ऑटोरिक्षा मार्गावरील शेअर भाडेदराची गणना करून दिली आहे. त्यामुळे विहित केलेल्या भाडेदरापेक्षा जादा भाड्याची मागणी करणाऱ्या ऑटोरिक्षा चालकांविरुद्ध ऑनलाईन तक्रार करण्यासाठी मोबाईल क्र.9423448824 (Whatsapp) उपलब्ध करून देण्यात आला आहे.

ऑटोरिक्षा चालकाद्वारे मोटार वाहन नियमांचे उल्लंघन करून जादा भाडे आकारणी, जादा प्रवासी वाहून नेणे, भाडे नाकारणे, प्रवाशांसी उद्धट वर्तन करणे, शिवीगाळ करणे इ. गुन्ह्यांकरिता ऑटोरिक्षा चालकाने कोणत्याही स्वरुपाचा गुन्हा केल्यास प्रवाशाने ठिकाण, दिनांक, वेळ व गुन्ह्याचे स्वरुप, फोटो इ. तपशिलासह वरीलप्रमाणे नमूद व्हॉटसअॅप 9423448824 क्रमांकावर तक्रार दाखल करावी. त्या तक्रारीची दखल घेऊन ऑटोरिक्षा चालकावर मोटार वाहन नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे कल्याण उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी कळविले आहे.

00000

संबंधित पोस्ट

मुंबई महापालिका निवडणुक प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज जाहीर-मुंबई महानगरपालिकेत दिसणार महिला राज, आरक्षण सोडतीत मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांपैकी 114 जागा महिलांसाठी राखीव…

vishwatmaklokswamivarta

श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत “राष्ट्रीय विज्ञान दिन” उत्साहात साजरा

विरेगाव ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी,पाच वर्षांचे विशेष लेखापरीक्षण करा; घरकुल-विहीर योजनांतील अनियमितता, सरपंच पदाच्या कथित अनधिकृत वापराची चौकशी करण्याची मागणी..

ठाणे जिल्ह्यातील हाऊसिंग सोसायटी इमारतीवरील मोबाईल टॉवर काढणार- मंत्री उदय सामंत

हर घर तिरंगा–हर घर स्वच्छता’ मोहीमांतून नवी मुंबईत स्वच्छतेसह आरोग्यावर भर

मुंबईत रेल्वेची प्रशासनाची दुसऱ्या दिवशीही मोठी कारवाई! मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वांद्रे स्थानक परिसरातील  अवैध बांधकामे जमीनदोस्त दगडफेक करणाऱ्या वर पोलिसांचा लाठी चार्ज परिस्थिती नियंत्रणात…