vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

विधानसभा प्रश्नोत्तर :’कर्करोग निदान व्हॅन’ ची स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबवून खरेदी- सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

विधानसभा प्रश्नोत्तर :’कर्करोग निदान व्हॅन’ ची स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबवून खरेदी- सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

मुंबई, प्रतिनिधी : कर्करोगाचे निदान वेळेवर होऊन कर्करुग्णांना तातडीने उपचार मिळण्यासाठी राज्यात आठ कर्करोग निदान व्हॅनची खरेदी करण्यात आली आहे. ही खरेदी जेम पोर्टलवर स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबवून करण्यात आली आहे. या व्हॅनमध्ये ४४ नग वैद्यकीय उपकरणे असून फर्निचर आणि कस्टमायझेशन यांचा समावेश आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. कर्करोग निदान व्हॅन खरेदी बाबत सदस्य भास्कर जाधव यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

 या प्रश्नाच्या उत्तरात राज्यमंत्री म्हणाल्या, स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबवून कमीत कमी दर आलेल्या कंपनीकडून व्हॅन खरेदी करण्यात आल्या आहेत. या खरेदी प्रक्रियेची चौकशी करण्याबाबत लोकप्रतिनिधी यांनी पत्र दिले आहे. त्यानुसार आयुक्त, आरोग्य सेवा यांच्यामार्फत सखोल चौकशी करून अधिवेशन संपण्याच्या आत अहवाल सादर करण्यात येईल.

या प्रश्नाच्या चर्चेमध्ये सदस्य विजय वडेट्टीवार, राहुल पाटील यांनी सहभाग घेतला.

00000

 

संबंधित पोस्ट

सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ अभियानाचा नवी मुंबईत उत्साहात प्रारंभ

राज्यात ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद· १ कोटीहून अधिक नागरिक लाभार्थी ७५ लाख ८७ हजार पेक्षा जास्त महिलांची तपासणी….

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा कोलवड येथून शुभारंभ;जिल्ह्यात २ लाख ३० हजार बालकांना पोलिओचे दोन थेंब देण्याचे उद्दिष्ट

एच.आय.व्ही. बाधित रूग्णांनी नियमितपणे ए.आर.टी. औषधोपचार घ्यावा – निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यात विशेष मोहिमांना गती

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून सहा महिन्यात पाच कोटी 92 लाखांची मदत..