vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भक्ती, परंपरा आणि आनंदाने भारलेली दिंडी – पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांचा उत्साही सहभाग

भक्ती, परंपरा आणि आनंदाने भारलेली दिंडी – पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांचा उत्साही सहभाग

जालना, (प्रतिनिधी)-जुना जालना भागातील संस्कार प्रबोधिनी शाळेतील पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गुरुवार हा दिवस एक खास, संस्मरणीयआणि भक्तिरसाने भरलेला ठरला. शाळेच्या वतीने जालना शहराचे आराध्य दैवतअसलेले श्री. आनंदी स्वामी मंदिरात पारंपरिक दिंडी सोहळा नेण्यात आला.पारंपरिक पोशाखात सजलेल्या चिमुकल्या वारकर्‍यांनी टाळ, मृदंग,पावल्यांच्या तालात भक्तिभावाने पुढे वाटचाल केली. वातावरण भक्तीमय आणि मंगलमय झाले होते.दिंडीदरम्यान विद्यार्थ्यांनी पारंपरिक पावली, फुगड्या, विविध प्रकारचीपालखी सजावट, लाठी-काठीचे आकर्षक प्रात्यक्षिक मुळे वातावरण भारावून गेले. मंदिराच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी मनोभावे सादर केलेल्याअभंगगायनाने तर सर्वांचेच अंत:करण पुलकित झाले. या उपक्रमामागे विद्यार्थ्यांमध्ये भक्तीभाव जागवणे, आपल्या संस्कृतीची ओळख करून देणे,तसेच लोककलांविषयी आत्मीयता निर्माण करणे हा प्रमुख उद्देश होता. आणि तो विद्यार्थ्यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने साकारला. या सुंदर दिंडी सोहळ्याचे आयोजन आणि मार्गदर्शन वर्ग पाचवी व सहावीचे शिक्षकवृंद अनितारावस, कैलास शिंदे, भागवत मराठे, प्रशांत बोधक, सुवर्णा पाठक, तसेचशिवनंदा बोबडे या सर्वांनी केले होते. शाळेच्या इतिहासात अशी दिंडी हीकेवळ एक परंपरा नसून विद्यार्थ्यांच्या मनावर कोरली गेलेली एक संस्कारमयआणि आनंददायी आठवण बनून राहिली.००००००

फोटो ओळी…..७- जुना जालना भागातील संस्कार प्रबोधिनी शाळेतील पाचवी व सहावीच्याविद्यार्थ्यांनी शाळा ते श्री. आनंदी स्वामी मंदिरापर्यंत पारंपरिक दिंडीकाढण्यात आली होती. यावेळी शिक्षकांची उपस्थिती होती.

संबंधित पोस्ट

ठाण्यात 15 नोव्हेंबर रोजी आदिवासी जनजागृती मेळावा व  आदिवासी सांस्कृतिक कला महोत्सवाचे आयोजन.

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद, ठाणे-*अनधिकृत शाळांपासून सावधान; मान्यताप्राप्त शाळेतच प्रवेश घ्या – शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे*

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता असल्याने दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

तुकाई उपसा जलसिंचन योजनेची कामे १५ जुलैपूर्वी पूर्ण करा- विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे अहिल्यानगर जिल्ह्यातील तुकाई व भैरवनाथ उपसा जलसिंचन योजनेचा आढावा

जालन्यातील जनहिताच्या प्रमुख प्रकल्पांना निधी उपलब्ध करा – खा. डॉ. कल्याण काळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. घाणेवाडी तलाव दुरुस्ती, आयसीटी कॉलेज, पाणी पुरवठा, प्रदुषण नियंत्रणाच्या उपाययोजनेसाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी. वाढत्या गुन्हेगारीवर आळा घाला, पोलीस ठाण्यांची संख्या वाढविण्याची केली मागणी…

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेविषयी आवाहन

vishwatmaklokswamivarta