vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मार्फत बांधकाम कामगारांना “गृहउपयोगी वस्तू संच” निशुल्क्‍ वाटप

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मार्फत बांधकाम कामगारांना “गृहउपयोगी वस्तू संच” निशुल्क्‍ वाटप

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी– महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाअंतर्गत बांधकाम कामगारांची नोंदणी, नुतनीकरण व विविध कल्याणकारी योजनांचे लाभवाटप करण्यात येते. सर्व कामकाज हे www.mahabocw.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन प्रणालीद्वारे निशुल्क करण्यात येते.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून नोंदीत जिवीत, सक्रीय कामगारांना मे.मफतलाल इंडस्ट्रीज लि. मुंबई या संस्थेच्या वितरण केंद्रावर गृहपयोगी संचाचे वाटप करण्यात येते. संच कुटुंबातील (पती / पत्नी) करीता एकच अनुज्ञेय राहणार आहे. गृहपयोगी संचाचे वाटप मंडळाच्या दि.30 जून 2025 रोजीच्या आदेशान्वये निश्चित दिनांक भेट पद्धत Appoinment System नुसार होणार असून मंडळाच्या http://hikit.mahabocw.in/appointment या संकेतस्थळाला भेट देऊन लाभार्थ्यांनी अपाईटमेंट घेऊन संच मिळवण्यासाठी संच वाटपाचा दिनांक व वितरण केंद्र याची निवड करावी. कामगाराने त्याने निवडलेल्या दिनांकास मंडाळोच ओळखपत्र अथवा आधार कार्ड व नियुक्ती पत्र घेऊन निवडलेल्या वितरण केंद्रावर उपस्थित राहिल्यानंतर ऑनलाईन प्रणाली प्रक्रियेनंतर कामगारांना प्रत्यक्ष संच ताब्यात देण्यात येईल.

वाटप पूर्णत : निशुल्क असून कोणत्याही एजंट, संघटना अथवा त्रयस्थ व्यक्ती यांच अमिषाला व दबावाला बळी पडू नये व त्यांचेशी कोणतेही आर्थिक व्यवहार करु नये. कोणत्याही व्यक्ती कडून नोंदणी, नुतनीकरण व लााभासाइी पैशाची मागणी केल्यास त्यांचे विरोधात जवळचे पोलीस स्टेशन व या कार्यालयास तक्रार दाखल करावी असे आवाहन सहायक कामगार आयुक्त ग.भा.बोरसे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

000000

संबंधित पोस्ट

छत्रपती संभाजीनगरात २२ फेब्रुवारी रोजी भव्य राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा

vishwatmaklokswamivarta

जम्मू-काश्मीरमध्ये यंदा ३५ हून अधिक ढगफुटीच्या घटना; सुमारे ३१ जणांचा मृत्यू…

महाविकास आघाडीला मोठा धक्का! माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश 

सहकारी संस्थांनी उत्पन्नाचे नवनवीन स्रोत निर्माण करावेत : प्रवीण दरेकर

पालकमंत्री यांची एकाच दिवशी तीन महाराजस्व शिबिरांना उपस्थिती नागरिकांपर्यंत पोहोचून सेवा देण्यासाठी उपक्रम- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

अभियांत्रिकी, वैद्यकीय प्रवेश परीक्षा मार्गदर्शन योजना राबविण्यासाठीमुख्याध्यापकांना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन..