vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

बांधकाम कामगारांच्या पाठिशी शासन खंबीरपण उभे– कामगार मंत्री आकाश फुंडकर,कृषी क्षेत्रात ‘एआय’ तंत्रज्ञान आणि शेतकरी हिताचे निर्णय– कृषी मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे शिक्षण क्षेत्रात सुविधावाढ व भरती प्रक्रिया गतीमान– शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

बांधकाम कामगारांच्या पाठिशी शासन खंबीरपण उभे– कामगार मंत्री आकाश फुंडकर,कृषी क्षेत्रात ‘एआय’ तंत्रज्ञान आणि शेतकरी हिताचे निर्णय– कृषी मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे शिक्षण क्षेत्रात सुविधावाढ व भरती प्रक्रिया गतीमान– शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबई, प्रतिनिधी: राज्य सरकारने कामगार, कृषी आणि शिक्षण क्षेत्रात व्यापक निर्णय घेतले असून विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, कायदे व धोरण तयार करण्यावर भर देण्यात आला आहे. कामगारांचे हक्क, शेतकऱ्यांची सुरक्षितता आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य या सर्व बाबींमध्ये शासनाने ठोस कृती आरंभलेली असल्याचे उत्तर कामगार मंत्री आकाश फुंडकर, कृषी मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे आणि शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत दिले.

 विधानपरिषद नियम 260 अन्वये विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी मांडलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना मंत्री बोलत होते.कामगार मंत्री अकाश फुंडकर म्हणाले की, कामगारांच्या कल्याणासाठी निर्णायक पावले उचलली जात असून राज्यातील बांधकाम कामगारांसाठी 32 कल्याणकारी योजना राबविल्या जात असून, त्यापैकी 22 योजना थेट डीबीटीद्वारे लाभ देणाऱ्या आहेत. बोगस नोंदणी आणि खोटे ठेकेदार यामुळे होणाऱ्या गैरप्रकारांवर आळा बसावा म्हणून कामगारांची बायोमेट्रिक नोंदणी सक्तीची करण्यात आली आहे. 90 दिवसांचे ठेकेदार प्रमाणपत्र बंधनकारक असून, संबंधित कायद्यानुसार त्याची अंमलबजावणी केली जात आहे. प्लॅटफॉर्म वर्कर्स (जसे झोमॅटो, गिग वर्कर) यांच्यासाठी स्वतंत्र कायदा तयार करण्याचे काम सुरू असून, त्यांना सामाजिक सुरक्षा देण्याची तरतूद या कायद्यात राहणार आहे. गिरणी कामगारांसाठी घरांची योजना आता अंतिम टप्प्यात असून, कामगार विभागाने 90% पात्रतेची तपासणी पूर्ण केलेली आहे. आता गृहनिर्माण विभागामार्फत घर वाटप सुरू आहे. सुपरमॅक्स व जनरल मोटर्स या कंपन्यांमध्ये कामगारांवरील अन्यायासंदर्भात सुनावणी सुरू आहे. शासनाने कामगारांच्या बाजूने ठाम भूमिका घेतली असून, कंपन्यांना तोपर्यंत कोणताही दिलासा दिला जाणार नाही, जोपर्यंत कामगारांना न्याय मिळत नाही.

राज्यात असंघटित कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, 1 कोटी 70 लाखांहून अधिक कामगार ‘ई-श्रम पोर्टल’वर नोंदणीकृत आहेत. त्यांच्या हक्कासाठी 68 वर्च्युअल बोर्ड तयार केले असून, सामाजिक सुरक्षा योजना अंतिम रूपात आणल्या जात आहेत. बोगस माथाडी कामगार प्रकरणांवर कठोर कारवाई सुरू आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर एसआयटी चौकशीने अहवाल सादर केला असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

00000

संबंधित पोस्ट

न्हावा-शेवा – शिवडी सागरी सेतूमुळे बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक-मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणेविशेष बाब म्हणून मुख्यमंत्र्यांशी यासंदर्भात चर्चा करणार..

पी.आर. जॅग्वार्सने पटकावला टीडब्ल्यूपीएल चषक-खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण  

शेतकरी केंद्रस्थानी ठेवुन बाजार समित्यांनी सुविधा पुराव्यात  -जिल्हा उपनिबंधक संजय सुद्रीक

सुखापुरी मंडळात बिबट्याचा वावर शेतकऱ्यांनी व ऊसतोड मजुरांनी कामे करतांनी सावधानता बाळगावी – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta

विशेष भारत निवडणूक आयोगाकडून ३३४ पक्षांची नोंदणी रद्द

राज्य महिला व बालविकास विभाग महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे तालुकास्तरीय केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित व न्यायिक मागण्या साठी क्रीडा संकुल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मागण्यांसाठी मोर्चा…