vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुक

नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडियाच्यावतीने नामवंत सिनेमॅटोग्राफर नवरोझ कॉन्ट्रॅक्टर यांना विशेष कार्यक्रमाव्दारे वाहणार आदराजंली

नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडियाच्यावतीने नामवंत सिनेमॅटोग्राफर नवरोझ कॉन्ट्रॅक्टर यांना विशेष कार्यक्रमाव्दारे वाहणार आदराजंली..

बॉलीवूड प्रतिनिधी-एनएफडीसी-नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडिया (एनएफडीसी-एनएफएआय) 11 ते 13 जुलै 2025 दरम्यान “थ्रू द आइज ऑफ नवरोज” हा तीन दिवसांचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्‍यात येणार आहे. या विशेष कार्यक्रमात ख्‍यातकीर्त छायाचित्रकार, छायालेखक, लेखक आणि चित्रपट निर्माता नवरोझ कॉन्ट्रॅक्टर यांनी सिनेमा क्षेत्रामध्‍ये केलेले उल्लेखनीय कार्य साजरे केले जाईल. नवरोझ कॉन्ट्रॅक्टर यांच्या दृश्य कथाकथनाने भारतीय चित्रपटसृष्टीवर अमिट छाप सोडली आहे.

या श्रद्धांजली कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, एनएफडीसी-एनएफएआय कॉन्ट्रॅक्टर यांच्या विशिष्ट कलाप्रयोग आणि कलात्मक दृष्टीचे प्रदर्शन करणारे निवडक चित्रपट प्रदर्शित करणार आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, 11 जुलै रोजी संध्याकाळी 6.30 वाजता दीपा धनराज दिग्दर्शित ‘क्या हुआ इस शेर को’ (1986) ने सुरू होईल, त्यानंतर शनिवार, 12 जुलै रोजी संध्याकाळी 6.30वाजता संजीव शहा दिग्दर्शित ‘हुन हुंशी हुंशीलाल’ (1992) हा चित्रपट दाखवला जाईल.

शेवटच्या दिवशी, रविवार, 13 जुलै रोजी तीन चित्रपट दाखवले जाणार आहेत.यामध्‍ये सकाळी 11 वाजता जयू आणि नचिकेत पटवर्धन दिग्दर्शित लिमिटेड माणुसकी (1995),दुपारी 2.00 वाजता परवेझ मेरवानजी दिग्दर्शित पर्सी (1989) आणि संध्याकाळी 6 वाजता मणि कौल दिग्दर्शित दुविधा (1973).रविवारी संध्याकाळी 5.00 वाजता होणाऱ्या विशेष गट चर्चेत भारतातील माहितीपट आणि वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट निर्मितीमध्ये नवरोझ कॉन्ट्रॅक्टर यांच्या योगदानावर आणि कॅमेऱ्यामागील त्यांच्या कामाच्या शैलीबाबत उहापोह करण्यात येईल. यावेळी त्यांच्या अद्वितीय संवेदनशीलतेवर चिंतन करण्यासाठी सहयोगी, विद्वान आणि चाहते एकत्र येतील.नवरोझ कॉन्ट्रॅक्टर यांची तीक्ष्ण दृष्टी आणि खोलवर मानवतावादी दृष्टिकोनामुळे अनेक महत्त्वाच्या चित्रपटांच्या दृश्य भाषेला आकार मिळाला.यामुळे ते भारतीय चित्रपटसृष्टीतील आदरणीय व्यक्तिमत्त्वांपैकी एक बनले.

या श्रद्धांजलीद्वारे, एनएफडीसी-एनएफएआय चित्रपट निर्माते आणि चित्रपटप्रेमींच्या पिढ्यांना सारखेच प्रेरणा देणाऱ्या दूरदर्शी कलाकारांच्या वारशाचे जतन आणि प्रचार करण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पुष्टी करते.सर्व स्क्रीनिंग पुण्यातील एनएफडीसी-एनएफएआय परिसरात होतील आणि विद्यार्थी, चित्रपट रसिक आणि सर्वसामान्यांसाठी खुले असतील. प्रवेश मोफत आहे आणि प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल 000

संबंधित पोस्ट

अखेर अभिनेते नाना पाटेकर, नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य, सामी सिद्धीकी निर्माता आणि राकेश सारंग दिग्दर्शक यांना न्याय मिळाला. 

चतु:रस्त्र अभिनेत्री निवेदिता सराफ यांचा यंदाचा गंधार गौरव पुरस्कार देऊन सन्मान, स्वरा जोशी हिला ही गंधार बाल पुरस्कार प्रदान.

vishwatmaklokswamivarta

महाभारत या लोकप्रिय मालिकेत कर्ण ही भूमिका साकारणारे अभिनेते पंकज धीर यांचं कर्करोगाने निधन…

vishwatmaklokswamivarta

कला व संस्कृतीमुळेच आदिवासींचा गौरवशाली इतिहास टिकेल: डॉ.अशोक उईकेभगवान बिरसा कला मंच व कै.लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेच्‍या विभागीय फेरीचे बक्षिस वितरण  

vishwatmaklokswamivarta

गुणसागर निर्गुणी’मधून उलगडणार गुरुवर्य पं. नीळकंठ अभ्यंकर यांच्या अमूल्य संगीत रचनांचा सुरेल ठेवा जन्मशताब्दी वर्षानिमित्त गुरुवर्य पं. नीळकंठ अभ्यंकर यांना सांगीतिक अभिवादन

श्यामची आई’ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा