vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर! Private ऑफिस कर्मचाऱ्यांनाही मोठा दिलासा

 मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर! Private ऑफिस कर्मचाऱ्यांनाही मोठा दिलासा

मुंबई प्रतिनिधी: भारतीय हवामान खात्याने आज मंगळवार, दिनांक 19 ऑगस्ट 2025 रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात (मुंबई शहर आणि उपनगरे) अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. त्याचप्रमाणे, मुंबईत सातत्याने पाऊस कोसळतो आहे. या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता, इतर सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यालये यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या नात्याने महानगरपालिकेकडून आज सुटी जाहीर करण्यात येत आहे.

खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम होमच्या सूचना

तसेच, मुंबई महानगरातील सर्व खासगी कार्यालये, आस्थापना यांनी आपल्या कामकाजाच्या स्वरूपानुसार, कर्मचाऱ्यांना घरी राहून कामकाज (वर्क फ्रॉम होम) करण्याच्या आणि अनावश्यक प्रवास टाळण्याच्या सूचना तातडीने द्याव्यात, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे आवाहन करण्यात येत आहे.

मुंबई पोलीस आयुक्तांचंही आवाहन

“आज मुसळधार पावसाचा इशारा असल्याने आपण सर्वजण सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करत आहात अशी आशा आहे. केवळ अत्यावश्यक असल्यासच बाहेर पडा, भरतीच्या वेळी समुद्रकिनारी जाणे टाळा आणि लक्षात ठेवा कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी आम्ही आहोत. खाजगी कंपन्यांना विनंती आहे की शक्य तितक्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ ची सुविधा उपलब्ध करून द्यावी. काळजी घ्या, सुरक्षित रहा,” अशी पोस्ट मुंबई पोलीस आयुक्तांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन करण्यात आली आहे.मुंबईमध्ये सोमवार रात्रीपासूनच जोरदार पाऊस कोसळत आहे. शाळांना सोमवारी आणि मंगळवारी आधीच सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

संबंधित पोस्ट

दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी घेतला सर्व विभागांच्या कामकाजाचा आढावा..नवी मुंबईकर नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा देत पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आयुक्तांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जनगणना 2027 मध्ये नागरिक ऑनलाईन पोर्टलव्दारे करू शकतात स्वगणना…

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिओ इथं ब्रिक्स शिखर परिषदेत ‘पर्यावरण, COP30 आणि जागतिक आरोग्य’ या विषयावरील सत्राला संबोधित केलं. यातील महत्त्वाच्या मुद्दे..

सिरोंचा उपविभागात गोदावरी नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे आवाहनपाण्याच्या विसर्गात वाढ होण्याची शक्यता..

vishwatmaklokswamivarta

महिला अत्याचाराची प्रकरणे निकाली काढण्यासाठी गोंदिया, रत्नागिरी, वाशिम येथे विशेष न्यायालये

राष्ट्रीय लोकअदालतीचे ९ मे रोजी आयोजन