vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

जालना येथे 26 ऑगस्ट रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

जालना येथे 26 ऑगस्ट रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

 

जालना प्रतिनिधी : नोकरीच्या शोधात असलेल्या जालना जिल्ह्यातील युवक-युवतींना विविध खासगी कंपन्या, कारखाने, उद्योग-व्यवसाय आणि आस्थापना यांचेकडील रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने तसेच रोजगार सहाय्यासाठी विशेष मोहिम सुरू करण्यात आली आहे. याप्रमाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांचे मार्फत जालना येथे दिनांक 26 ऑगस्ट 2025 मंगळवार रोजी “प्लेसमेंटड्राईव्ह -जागेवर निवड संधी” चे आयोजन सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत करण्यात आले आहे.

यासाठी बजाज ऑटो प्रा.लि.छत्रपती संभाजीनगर चे अप्रेंटिस करिता आय.टी. आय.कोणताही ट्रेड / डिप्लोमा उत्तीर्ण साठी 20 पदे, डिप्लोमा कोणताही ट्रेड उत्तीर्ण साठी टेक्नीशियनची 20 पदे तसेच मेकॅट्रॉनिक्स डिप्लोमा करिता आय टी आय / डिप्लोमा चे 20 पदे त्याचप्रमाणे टाटा मोटर्स प्रा.लि. पुणे यांचे ऑपरेटर पदाकरिता बारावी पास, आय.टी. आय / डिप्लोमा उत्तीर्ण साठी 50 पदेअशी एकूण 110 रिक्तपदे प्राप्त झालेली आहेत.

याकरीता नोकरी इच्छुक पात्रता धारक उपस्थित होणा-या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येवून जागेवरच निवडीची संधी उपलब्ध आहे. विशेष म्हणजे “कमवा आणि शिका योजने” अंतर्गत पुणे येथे मेकॅट्रॉनिक्स डिप्लोमा करताना बेरोजगार उमेदवार यांना स्टायपेंड मिळणार आहे त्यामध्ये मोफत बस सुविधा,जेवण यांचा समावेश असून त्याच ठिकाणी त्यांना नोकरीची संधी देखील मिळणार आहे. जालना जिल्ह्यातील नोकरी इच्छुकांनी या संधीचा लाभ व अधिक माहिती घेण्यासाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी.

त्याच प्रमाणे केंद्र शासनाच्या एन.सी.एस. पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी देखील www.ncs.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. यापूर्वी नोंदणी केली नसल्यास प्रथम आपली नोंदणी करावी आणि होम पेज वरील नोकरी साधक (Job Seekar) लॉगिन मधून आपल्या युजर आयडी पासवर्ड च्या आधारे लॉगिन करावे.त्यानंतर डॅसबोर्ड मधील पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर या बटनावर क्लिक करून जालना जिल्हा निवडून त्यातील [PLECEMENT DRIVE (2025-26) JALNA] 03 याची निवड करावी किमान दोन प्रतीत बायोडाटासह फोटो,शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता, इ.कागदपत्रे कंपनींना देण्यासाठी छायाप्रती संच सोबत ठेवून दिनांक दिनांक 26 ऑगस्ट मंगळवार रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत प्रत्यक्ष मुलाखतीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय जालना 431203 येथे उपस्थित राहून या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये सहभागी व्हावे आणि रोजगाराच्या या पर्वणीचा निश्चित लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, जालना यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे

संबंधित पोस्ट

शिवभोजन केंद्रांना गॅस पुरवठ्याबाबत शासन सकारात्मक- मंत्री छगन भुजबळ· बंद केंद्रे लवकरच सुरू करणार

महाराष्ट्र सरकारचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गॅलक्सी रूग्णालयात जावून मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट 

vishwatmaklokswamivarta

चाकण एमआयडीसीतील समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार रस्ते, वाहतूक अन् पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक, उद्योग प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा; प्रशासनाला दिल्या तातडीने सूचना

अमरावतीत १०० मुलांच्या शासकीय वसतिगृहासाठी इमारतीची आवश्यकता;१५ दिवसांत अर्ज करण्याचे आवाहन 

दिव्यांग प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी ३० जूनपर्यंत अर्ज करा*

राज्यातील प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी मिळावे ही शासनाची भूमिका- राज्यमंत्री मेघना बोर्डीकर