vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धेसह विविध कार्यक्रमाचे आयोजन

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धेसह विविध कार्यक्रमाचे आयोजन

रायगड प्रतिनिधी- मेजर ध्यानचंद हॉकीचे जादुगार यांचा जन्मदिन 29 ऑगस्ट हा देशभर राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. राज्यामध्ये क्रीडा व खेळाचा प्रचार व प्रसार व्हावा, ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांपर्यंत क्रीडा व खेळाचे महत्त्व पोहोचविणे, निरोगी राहण्याचा संदेश जावा, युवक युवतींमध्ये क्रीडा विषयक वातावरण तयार व्हावे तसेच क्रीडा संस्कृतीचे संवर्धन व जतन व्हावे या हेतूने केंद्र व राज्य शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे दि. 29 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट, 2025 या कालावधीत जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी, रायगड यांचेवतीने विविध क्रीडा विषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

दि. 29 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 7.30 वाजता अलिबाग येथे भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले जाणार असून 15 व 17 वर्षाखालील मुले व मुली, खुला गट पुरुष व महिला वयोगटात सदर आयोजन होणार आहे. तर लोकप्रतिनिधी, वरीष्ठ नागरिक, वरीष्ठ शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी “ड्रीम रन” चे आयोजन होणार आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्यासह इतर वरीष्ठ अधिकारी सुध्दा “ड्रीम रन” मध्ये सहभागी होणार आहेत. सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र तर विजेत्यांना ट्रॉफीज दिल्या जाणार आहेत.

तसेच जिल्ह्यातील राष्ट्रीय तसेच राज्य क्रीडा पुरस्कारार्थीचा त्याचबरोबर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित क्रीडा स्पर्धांमध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंचा सुध्दा माननीय लोकप्रतिनिधी यांचे शुभहस्ते भव्य सत्कार करण्यात येणार आहे. तरी रायगड जिल्ह्यतील क्रीडाप्रेमींनी या राष्ट्रीय क्रीडा दिन कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हा क्रीडा अधिकारी, प्रकाश वाघ यांनी आवाहन केले आहे.

००००००

संबंधित पोस्ट

विकसित महाराष्ट्र २०४७-युवा व क्रीडा संवादा’ची नागपुरातून सुरुवात क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी साधला मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्याशी थेट संवाद

vishwatmaklokswamivarta

फुटबॉल मधील भविष्यातील हिरे घडविण्यासाठी क्रीडा विभागाचा प्रोजेक्ट “महादेवा”**महाराष्ट्रातील 13 वर्षांखालील मुलगा‑मुलींच्या फुटबॉल कौशल्याचा शोध घेण्यासाठी शासनाचे प्रयत्न*

vishwatmaklokswamivarta

सरस्वती भुवन प्रशालामध्ये राज्य़ क्रीडा दिनाचे उत्साहात साजरा

vishwatmaklokswamivarta

फिट इंडिया उपक्रमांतर्गत सांगलीत सायकल रॅली- शरीर निरोगी राहण्यासाठी किमान अर्धातास दररोज व्यायाम करा

DJP कॅम्पसमध्ये जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद.

मिशन लक्षवेध’ अंतर्गत जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्रासाठी खेळाडूंची निवड चाचणी;30 मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन