vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

विशेष वृत्त-राज्यात आठ महिन्यात ३.४१ लाख जातवैधता प्रमाणपत्रांचे वितरण

विशेष वृत्त-राज्यात आठ महिन्यात ३.४१ लाख जातवैधता प्रमाणपत्रांचे वितरण

मुंबई, प्रतिनिधी: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत विकसित ऑनलाईन पोर्टलद्वारे जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आली आहे. राज्यात जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून जानेवारी २०२५ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत ३ लाख ४१ हजार ९७३ विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली असल्याची माहिती ‘बार्टी’चे महासंचालक सुनील वारे यांनी दिली.

  या प्रक्रियेला अधिक सुलभ व पारदर्शक करण्यासाठी शासनाने विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. महाराष्ट्र अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, इमाव व विमाप्र (जात प्रमाणपत्र देण्याचे व पडताळणीचे विनियमन) अधिनियम, २००० व नियम २०१२ अंतर्गत अर्जदारांना जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. समित्या आवश्यक कागदपत्रांची छाननी करून त्रुटी असल्यास मार्गदर्शन करतात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या माध्यमातून विकसित केलेल्या ऑनलाईन पोर्टलवर संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन सुरू करण्यात आली आहे. यात अर्ज सादर करणे, ट्रॅक करणे, त्रुटींची ऑनलाईन पूर्तता, सेवा शुल्क भरणे, डिजीलॉकर व ई-मेलद्वारे प्रमाणपत्र मिळविणे, सचित्र मार्गदर्शन आणि २४x७ हेल्पलाईन यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत.

  राज्यातील ३६ जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांचे मुख्य समन्वयक म्हणून बार्टीचे महासंचालक कार्यरत असून, अनुसूचित जमाती वगळता इतर सर्व जातींच्या जात पडताळणीची जबाबदारी या समित्यांकडे आहे.

 

****

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षाआता 28 सप्टेंबर ऐवजी 9 नोव्हेंबरला- प्रशिक्षण वर्ग पुढे ढकलले

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय महामार्ग 166 (एच) अंतर्गत पेठ ते सांगली रस्त्याचे निवाडे पूर्ण मोबदल्यासाठी संपर्क साधावा – जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta

ऑपरेशन सद्भावना” लोकशाही बळकट करणारा उपक्रम- राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन· सिक्कीमच्या विद्यार्थ्यांचा राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्यासोबत संवाद

vishwatmaklokswamivarta

शेतकरी केंद्रस्थानी ठेवुन बाजार समित्यांनी सुविधा पुराव्यात  -जिल्हा उपनिबंधक संजय सुद्रीक

शिष्यवृत्तीचे अर्ज 15 जून पर्यंत भरण्याचे आवाहन…

भूमि अभिलेख विभागातील कर्मचा-यांचे प्रलंबित प्रश्नांवर कामबंद आंदोलन..