vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

जन, पर्यावरण व समृद्धीसाठी बांबू’ या विषयावर‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचा विशेष संवाद..

जन, पर्यावरण व समृद्धीसाठी बांबू’ या विषयावर‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचा विशेष संवाद..

मुंबई, प्रतिनिधी : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमाच्या भाग -२ मध्ये राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष तसेच मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास कृती समितीचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. या मुलाखतीतून ते ‘जन, पर्यावरण व समृद्धीसाठी बांबू’या विषयावर सविस्तर संवाद साधणार आहेत.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार, दि. २३ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ८.०० वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पाहता येणार आहे. तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत या समाजमाध्यमांवर देखील उपलब्ध होईल. ही मुलाखत निवेदक डॉ. मृण्मयी भजक यांनी घेत

 आंतरराष्ट्रीय बांबू दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या “महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन”(MITRA) व फिनिक्स फाऊंडेशनच्या वतीने यशवंतराव चव्हाण केंद्र, मुंबईं येथे ‘बांबू परिषदेचे’आयोजन करण्यात आले. या परिषदेमध्ये देशभरातील नामवंत तज्ज्ञ, अभ्यासक व उद्योजकांनी सहभाग नोंदविला. बांबूच्या उपयोगाचे महत्त्व, पर्यावरण संरक्षणातील त्याचे योगदान तसेच शाश्वत विकासात बांबूची भूमिका अशा विविध विषयांवरील चर्चासत्रांच्या माध्यमातून यावेळी संवाद साधण्यात आला. त्याअनुषंगाने ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमाच्या भाग-२ मध्ये हवामान बदलाशी लढण्यासाठी बांबूचा उपयोग, शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा फायदेशीर आणि शाश्वत स्रोत तसेच बांबूपासून निर्माण होणारे विविध पिकांचे इंधन आदी विषयावर अध्यक्ष पाशा पटेल यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना उमेदवार निवड मेळाव्याचे आयोजन

पुणे विमान नगर भागामध्ये एका पुणे महानगर पालिकेच्या माथेफिरू संजय पोल या अधिकाऱ्याने ५ वर्ष जुने श्रीराम मंदिर तोडले असता पुन्हा बांधणे सुरू

कृषि विभागाकडून शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे उगवण क्षमतेची प्रात्यक्षिके

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमता चाचणी (TAIT) परीक्षा…

vishwatmaklokswamivarta

स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम : शेख महेमूद

प्रदूषणमुक्त पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे नवी मुंबईकर नागरिकांना जाहीर आवाहन

vishwatmaklokswamivarta