vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

ऑनलाइन लर्निंग लायसन्स चाचणी बंद

ऑनलाइन लर्निंग लायसन्स चाचणी बंद

राज्य प्रतिनिधी-

वाहन चालवण्यासाठी आवश्यक असलेली ऑनलाइन लर्निंग लायसन्स चाचणी तात्पुरती बंद करण्यात येणार आहे. फील्ड अधिकाऱ्यांच्या तपासणीत फेसलेस प्रणालीतील गंभीर त्रुटी उघड झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटरला पत्र दिले आहे.

चाचणीत उमेदवार उपस्थित नसतानाही परवाना मिळविणे शक्य होत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले. जन्मतारीख, पत्ता व इतर माहितीमध्ये फेरफार करता येत असल्याचेही आढळून आले. या पार्श्वभूमीवर परिवहनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली.अनेक तरुण अठरा वर्षे पूर्ण होताच मोठ्या संख्येने लर्निंग लायसन्स काढतात. त्याचा वापर पक्क्या परवान्यासारखा करून निष्काळजीपणे वाहन चालवले जात असल्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहे, असे निदर्शनास आले.

इतर काही राज्यांमध्ये तृतीय पक्षामार्फत फेसलेस चाचण्या घेण्याची पद्धत आहे. महाराष्ट्रातही ती पद्धत राबवता येईल का, याची चाचपणी केली जाणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय जाहीर होईल.

दरम्यान केरळ, तेलंगणा, झारखंड, उत्तराखंड, त्रिपुरा, मेघालय, नागालँड, लडाख आणि लक्षद्वीपसारख्या राज्यांत व केंद्रशासित प्रदेशांत लर्निंग लायसन्स परीक्षा थेट आरटीओ कार्यालयांतच घेतली जाते. महाराष्ट्रात कोणती पद्धत सुरक्षित ठरेल, याचा अंतिम निर्णय लवकरच होणार आहे

संबंधित पोस्ट

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन

प्रत्येक शाळेत बाल सुरक्षा समिती आणि मुंबईतील सर्व २२७ प्रभागांमध्ये ‘वॉर्ड बाल संरक्षण समिती’ स्थापन करण्यासाठी लवकरच धोरण

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 महत्वकांक्षी योजना.सप्टेंबर २०२५ पर्यंत ५००० मेगावॅटचे प्रकल्प पूर्ण करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस..

परभणीतील शेतकऱ्यांना पाणी उपलब्धता वाढविण्यास प्राधान्य द्यावे – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर जलसंधारण व सिंचन क्षमतेसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे

मुंबईतील उंच इमारतींसाठी अग्निसुरक्षा व्यवस्था सक्षम करण्यात येणार- मंत्री उदय सामंत

मराठवाडा चेंबर ट्रेड अँड कॉमर्सची उद्या व्यापार परिषद२८ वा वर्धापन दिननिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यक्रमाचे आयोजन