vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

शिवसेनेचा दसरा मेळावा गोरेगावच्या नेस्को मैदानावर पार पडला. या मेळाव्याला सुरुवात करण्यापूर्वी शिवसेनेच्या वतीने पूरग्रस्तांकरिता पाठवण्यात येणाऱ्या मदतीच्या ट्रक्सना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भगवा दाखवला, मेळाव्यात मांडलेले काही विशेष मुद्दे

शिवसेनेचा दसरा मेळावा गोरेगावच्या नेस्को मैदानावर पार पडला. या मेळाव्याला सुरुवात करण्यापूर्वी शिवसेनेच्या वतीने पूरग्रस्तांकरिता पाठवण्यात येणाऱ्या मदतीच्या ट्रक्सना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भगवा दाखवला, मेळाव्यात मांडलेले काही विशेष मुद्दे

राज्य प्रतिनिधी-

शिवसेनेचा दसरा मेळावा गोरेगावच्या नेस्को मैदानावर पार पडला. या मेळाव्याला सुरुवात करण्यापूर्वी शिवसेनेच्या वतीने पूरग्रस्तांकरिता पाठवण्यात येणाऱ्या मदतीच्या ट्रक्सना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भगवा दाखवला दरम्यान दसरा मेळाव्यातील काही विशेष मुद्दे,#अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शासन मदत करेल,त्यासोबतच शिवसेनाही त्यांना मदत देत आहे, शेतकऱ्यांची दिवाळी दु:खी होऊ देणार नाही -# बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणुकीनुसार शिवसेना ८० टक्के समाजकारणाच्या मार्गानं पुढे जात आहे आणि जात राहील – #शेतकऱ्यांना आजवर महायुती सरकारनंच मदत केली, शेतकरी सन्मान योजना आणि इतर अनेक पावलं उचलून शेतकऱ्यांना मोठी मदत केली – #नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलामुलींच्या लग्नाच्या खर्चाची जबाबदारी शिवसेना घेईल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,

सोने , विचारांचं देऊ-घेऊ मनसोक्त, भगवे विचार आणि भगवचं रक्त…”, अशा होर्डिंगनं गुरुवारी संपूर्ण गोरेगाव भगवामय झालेलं दिसून आलं. निमित्त होतं शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचं. हातात भगवे झेंडे आणि मुखी शिवसेनेचा जयघोष करीत हजारो शिवसैनिक नेस्को संकुलात दाखल झाले. सभास्थळी जागा अपुरी पडल्यानं सभामंडपाबाहेर स्क्रिन लावून गर्दी विभाजित करण्यात आली.मेळावा यंदा गोरेगावच्या नेस्को संकुलात :उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा गोरेगावच्या नेस्को संकुलात आयोजित करण्यात आला. यंदाचा दसरा मेळावा शेतकऱ्यांच्या बांधावर साजरा करावा, असं आवाहन शिंदे यांनी केलं होतं. त्यामुळे केवळ मुंबई, ठाण्यासह महानगरातील शिवसैनिक या मेळाव्यात उपस्थित होते.

“काही लोक पूरग्रस्त भागात जाऊन नौटंकी करून आले. शेतकऱ्यांना म्हणतात, माझे हात रिकामे आहेत, माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे काही नाही. पण, 30 वर्षे मुंबई पालिका तुमच्या हातात होती, एवढी माया गेली कुठं? लंडनला?” असा सवाल शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना उद्देशून विचारला. “या एकनाथ शिंदेचे हात देणारे आहेत. केवळ माझेच नाहीत, तर माझ्या लाखो शिवसैनिकांचे हातही देणारे आहेत. संपत्ती, प्रॉपर्टीचा मोह आम्हाला नाही. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे”, असा घणाघातही त्यांनी केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा गोरेगावच्या नेस्को संकुलात आयोजित करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी माजी आमदार राजन तेली आणि अण्णासाहेब माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तसंच धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता कक्षाची सुरुवात यावेळी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलामुलींची लग्न या आपत्तीमुळे रखडली असतील, त्याची जबाबदारी शिवसेना घेईल, अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली. बाळासाहेब ठाकरे यांचे 2026 हे जयंती वर्ष शिवसेना मोठ्या जल्लोषात साजरे करेल, असंही त्यांनी सांगितलं.

…म्हणून मेळावा मुंबई, ठाण्यापुरता मर्यादित : “शिवसेनेचा दसरा मेळावा आपण साजरा करतोय, पण आपला बळीराजा संकटात आहे. मराठवाड्यात आणि इतर ठिकाणी आपला बळीराजा संकटात आहे. त्यामुळं आपण ठरवलं की, ज्या-ज्या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे, तेथील कार्यकर्त्यांना सांगितलं की शेतकऱ्यांच्या बांधावर थांबा. शेतकऱ्यांना मदतीचा हात द्या, त्याचं कुटुंब सावरा. त्यामुळं यंदाचा मेळावा आपण मुंबई, ठाण्यापुरता मर्यादित ठेवला,” असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

80 टक्के समाजकारण, 20 टक्के राजकारण : “शेतकऱ्यांचं दु:ख मोठं आहे. त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. त्यामुळं संकटकाळात मी धाऊन जाणार नाही, असं कधी होणार नाही. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हा बाळासाहेब ठाकरे यांचा गुरुमंत्र घेऊन आम्ही चाललो आहोत. जिथं संकट तिथं शिवसेना. जिथं आपत्ती आली, तिथं एकनाथ शिंदे धावून गेला, कारण ही बाळासाहेबांनी दिलेली जबाबदारी आहे. त्यामुळं बळीराजाच्या हितासाठी आपण घेतलेल्या निर्णयाबद्दल आज बाळासाहेबांनी आपली पाठ थोपटली असती,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही : याचबरोबर, “शेतकऱ्यांना विनंती आहे, धीर सोडू नका, टोकाचं पाऊल उचलू नका. तुम्हाला पुन्हा उभं करण्यासाठी शिवसेना आणि महायुती सरकार सदैव कटिबद्ध राहील. तुम्हाला दिवाळीपूर्वी मदत दिली जाईल, हा तुमच्या एकनाथ शिंदेचा शब्द आहे. शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, ” असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिलं.

ते पक्षप्रमुख नव्हे, कट प्रमुख,उद्धव ठाकरेंवर शाब्दिक हल्ला चढवताना एकनाथ शिंदे म्हणाले, “ते पक्ष प्रमुख नाहीत, कारस्थान करणारे कट प्रमुख आहेत. आपल्याच कार्यकर्त्यांना संपवणारा, त्यांच्या विरोधात कट करणारा पक्षप्रमुख कसा होऊ शकतो?”, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.”गेला तो कचरा असं ते म्हणतात. पण कधी आत्मपरीक्षण केलं का? हजारो माणूस चुकीचे आणि एक माणूस बरोबर? स्वतःच्या पक्षातील लोकांना संपवणार पक्षप्रमुख जगात दुसरा नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांची स्वतःची सावली देखील त्यांच्या सोबत राहील की नाही, याबाबत साशंकता आहे” असंही शिंदे म्हणाले.

: फोटोग्राफरला फोटोशिवाय काय दिसणार?

उद्धव ठाकरेंवर टीका करताना एकनाथ शिंदे म्हणाले,”कपड्याची इस्त्री सांभाळणारा आणि व्हॅनिटी व्हॅन घेऊन दौरे करणारा एकनाथ शिंदे नाही. आपत्तीवेळी घरात बसणारा बाळासाहेबांचा शिवसैनिक असू शकत नाही. विरोधकांना फक्त आमचे फोटो दितात, त्याच्या आतलं समान दिसत नाही. 26 प्रकारचं समान आम्ही वाटलं, तुम्ही एक बिस्किटचा पुडा तरी सोबत नेला का? फोटोग्राफरला फोटोशिवाय काय दिसणार?,” असा टोला त्यांनी लगावला.कोरोनाकाळात जमा केलेल्या 600 कोटीचं काय केलं?

एकनाथ शिंदे म्हणाले, “काही लोक पूरग्रस्त भगत जाऊन नौटंकी करून आले. पण आधी आमचे मदतीचे ट्रक पोहोचले, मग एकनाथ शिंदे पोचला. साथरोग पसरू नये, म्हणून आम्ही आरोग्य कॅम्प घेतले. अशावेळी हात हलवत गेलेल्या आणि तोंड वाजवत आलेल्यांना आमच्यावर बोलण्याचा काय अधिकार?,” असा सवाल त्यांनी केला.”तिकडे नेत्यांच्या पायाला चिखल लागू नये म्हणून रॅम्प लावला (शिवाजी पार्क मैदानात), यांना बळीराजाचं दुःख काय कळणार? कुठंही गेले की माझ्या हातात काय आहे, असं म्हणतात. पण होतं तेव्हा तरी काय दिलं? कालही नाही, आजही नाही आणि उद्याही देणार नाहीत. पण, या एकनाथ शिंदेचे हात देणारे आहेत. केवळ माझेच नाहीत, तर माझ्या लाखो शिवसैनिकांचे हातही देणारे आहेत. संपत्ती, प्रॉपर्टीचा मोह आम्हाला नाही. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे.””30 वर्षे मुंबई पालिका हातात होती, मग एवढी माया गेली कुठं? लंडनला? तुम्ही कोव्हिडमध्ये 600 कोटी जमा केले, त्यातला एक रुपया तरी कोणाला दिला का? असा सवाल शिंदेंनी केला. त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे,” असं शिंदे म्हणाले

निधनानंतर दोन दिवस बाळासाहेबांची बॉडी मातोश्रीवर ठेवली – रामदास कदम शिवसेना नेते रामदास कदम यांनी यावेळी आक्रमक भाषण केलं. ते म्हणाले, “उद्धव ठाकरे आज मी तुमच्या दसरा मेळाव्याची स्थिती पहिली, ती पाहून डोळ्यात पाणी आलं. तुम्ही शिवसेना काँग्रेसच्या चरणात नेऊन ठेवली. पण, एकनाथ शिंदे यांनी ती पुन्हा हिंदुत्वाच्या मार्गावर आणली, याचं समाधान आहे. इकडे जमलेले सगळे मावळे आणि तिकडे जमलेले कावळे आहेत,” अशी टीका त्यांनी केली.

“30 वर्ष तुमच्या हातात महापालिका आहे, तरीही पुन्हा म्हणतात आम्ही घेणार. त्या राज ठाकरेंच्या मागे करोटा घेऊन लागले आहेत. तो सोबत येईल का नाही, याबाबत उद्धव ठाकरे साशंक आहेत. पण आज मी सांगतो, मराठी माणूस उद्धव ठाकरेंना घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही, ” असं रामदास कदम म्हणाले.”उद्धव ठाकरेंना शिवसेनाप्रमुखांचे नाव घेण्याचा अधिकार आहे का? शिवसेनाप्रमुखांचे निधन कधी झालं आणि त्यांचं शव किती दिवस मातोश्रीवर होतं, याचा शोध घ्या. दोन दिवस बॉडी मातोश्रीवर ठेवली होती, हे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाही विचारा. कोणीतरी म्हणतं, संपत्तीसाठी बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले. त्यामुळे बाळासाहेबांचं मृत्यूपत्र कोणी, कधी तयार केलं हे बाहेर काढा,” असं रामदास कदम म्हणाले.

“बाळासाहेब गेल्यानंतर माझं शिवाजी पार्कवरचं भाषण बंद झालं. गुलाबराव पाटील यांना टाळ्या पडतात, त्यामुळे त्यांचंही भाषण बंद झालं. त्यामुळे आता मुंबई मिळवण्यासाठी एकदिलाने लढा देऊया. मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करणाऱ्या उद्धव ठाकरेंना राजकारणातून उध्वस्त केलंच पाहिजे,” असं रामदास कदम म्हणाले.आम्ही नकली नव्हे, असली – गुलाबराव पाटील : मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “आम्ही नकली नाही, असली आहोत. संजय राऊत नावाचं भूत आहे, 10.30 वाजता त्याच्या अंगात भूत संचारतं. राऊत तू कोण आहेस? उद्धव ठाकरे यांना आजपर्यंत मी आदरणीय म्हणत राहिलो. पण, आज राहुल गांधींनी स्वातंत्रवीर सावरकरांवर टीका केली. तुमच्यात हिम्मत असले, तर त्यांना विरोध करून दाखवला. पण ते करणार नाहीत. कारण, तुमची शिवसेना काँग्रेसमय झाली आहे. आमची शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांवर चालली आहे. संजय राऊत यांनी ज्यांची ज्यांची सगाई लावण्याचा प्रयत्न केला, त्यांचं लग्न तुटलेले आहे. त्यामुळे राज ठाकरेंना कितीही आय लव्ह यु म्हणालात, तरी संजय राऊतांमुळे ते शक्य होणार नाही. जळगाव जिल्ह्याच्या वतीनं पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 25 लाखांची मदत मी यानिमित्ताने जाहीर करतो,” असं गुलाबराव म्हणाले.

संबंधित पोस्ट

सकलेचा नगरवासीयांची नागरी समस्यांपासून होणार मुक्तता, भास्कर आबा दानवे यांच्या पुढाकाराने कामांना सुरुवात…

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 61 जिल्हा परिषद गट व 13 पंचायत समिती सभापतीचे आरक्षण सोडत जाहीर

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता आरक्षण सोडत सुव्यवस्थित रितीने संपन्न

vishwatmaklokswamivarta

सांगलीच्या स्मृती सदैव स्मरणात राहतील- मावळते जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

vishwatmaklokswamivarta

बेटी बचाओ बेटी पढाओ जनजागृती अभियानाचा गडचिरोलीत शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

अड. देसाई क्रिडांगणात कै. महेश मोरे यांच्या स्मरणार्थ क्रिकेट टुर्नामेंट संपन्न

vishwatmaklokswamivarta