vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

आमदार संग्राम भैय्या जगताप यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

आमदार संग्राम भैय्या जगताप यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

 

राज्य प्रतिनिधी –

अजित पवारांनी पक्षप्रमुख म्हणून आमदार संग्राम भैय्या जगताप यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार असल्याचे सांगितले. काल करमाळा येथील जनआक्रोश मोर्चामध्ये संग्राम भैय्या यांनी दिवाळीची खरेदी हिंदू बांधवांकडूनच करा, असं आवाहन केले. त्यावर बराच वाद सुरू झाला आणि आज पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजितदादांनी संग्राम भैय्या जगताप यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे सांगितले.

एकंदर परिस्थिती बघता, आमदार संग्राम भैय्या यांनी या निवडणुकीनंतर जाहिरपणे घेतलेला हिंदुत्वाचा मुद्दा लोकांना जास्त भावला आहे. आमदार संग्राम जगताप यांना त्यांच्या सुरुवातीपासूनच्या राजकीय प्रवासाचे साक्षीदार म्हणून एक गोष्ट ठामपणे सांगू शकते की, आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्या पोटात एक, ओठात एक असा काही प्रकार नसतो. विरोध म्हंटला तर विरोधचं आणि कट्टर समर्थक म्हंटलं तर कट्टरचं__! महाराष्ट्रातील सत्तेतल्या २८७ आमदारांना जे करता आलं नाही, ते कत्तलखाने पाडायला लावण्याचे काम संग्राम भैय्या जगताप यांनी केले आहे.

आज महाराष्ट्रभरातून संग्राम भैय्या जगताप यांना वाढता पाठिंबा आहे. भैय्यांनी आधी ही कधी पक्ष, वगैरे गोष्टी बघितल्या नाहीत, आता तर ती गरजही नाही. पण एक गोष्ट नक्की, की कारणे दाखवा नोटीस आली तरी संग्राम भैय्या जगताप यांना पाठिंबा म्हणून हजारो सह्यांचे कागद अजितदादांकडे जातील___! राहिला प्रश्न, पक्षादेशाचा तर, झालेल्या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला कोणाचे किती मतदान झाले, याचं आत्मपरीक्षण करावे. आमदार संग्राम भैय्या जगताप यांनी घेतलेल्या हिंदुत्ववादी भुमिकेचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला झालाचं तर फायदाच होणार आहे, हे ही लक्षात घेणे गरजेचे आहे‌.

हिंदुत्व हे केवळ राजकीय अजेंडा नाही, तर ती येणार्या काळाची गरज आहे, हे आता तरी अजितदादांनी ओळखावं. बाकी, संग्राम भैय्या जगताप यांचा प्रवास हिंदुत्वाच्या वाटेने सुरू झालाय, तो हिंदू म्हणून यशस्वी ठरणारं आहेचं पण राजकीयदृष्ट्या सुद्धा तेव्हढाचं मैलाचा ठरणारं आहे.

00000

संबंधित पोस्ट

मा. श्री. रविंद्र चव्हाण साहेब यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन… 🎉✌🏻

महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख: राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध

वैष्णवी प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया …

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांच्या माध्यमातून प्रभावीपणे रुग्ण सेवा द्यावी – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

vishwatmaklokswamivarta

मुंबईत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलीस दबाव टाकत आहेत असा आरोप करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट

उपराष्ट्रपती पदासाठी इंडि आघाडीचे बी.सुदर्शन रेड्डी अर्ज दाखल