vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

घणसोली बेघर निवारा केंद्रात जागतिक बेघर दिनानिमित्त सामाजिक कृतज्ञता कार्यक्रम संपन्न 

घणसोली बेघर निवारा केंद्रात जागतिक बेघर दिनानिमित्त सामाजिक कृतज्ञता कार्यक्रम संपन्न

 

राज्य प्रतिनिधी- १० ऑक्टोबर या जागतिक बेघर दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या घणसोली येथील शहरी बेघर निवारा केंद्रामध्ये सामाजिक कृतज्ञता कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे निर्देशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या नियंत्रणाखाली हा कार्यक्रम समाजविकास विभागाच्या उपायुक्त श्रीम. नयना ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.

 या कार्यक्रमाप्रसंगी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीने केंद्राकरिता टेलिव्हिजन, वॉशिंग मशीन, CCTV, लॉकर, योगा मॅट, फ्रिज इ. साहित्याचे वाटप करण्यात करण्यात आले. यावेळी स्मॉल इंडस्ट्रिज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक श्री. राजेश कुमार, नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे सहआयुक्त श्री.शंकर गोरे, नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या उपआयुक्त श्रीम.प्रणाली घोंगे आदी मान्यवर उपस्थित होते.

 नवी मुंबई महानगरपालिका या बेघर निवारा केंद्राच्या माध्यमातून चांगले काम करीत असल्याबद्दल कौतुक करीत येथील व्यवस्थेबद्दलही मान्यवरांनी समाधान व्यक्त केले. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीने लायबिलिटी हेड श्री.रंजितकुमार मिश्रा तसेच विभागीय व्यवस्थापक श्री रोहित प्रकाश उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

उपनगरी रेल्वेतून पडून प्रवाशांचा झालेला मृत्यू दुर्दैवी आणि क्लेशदायक- उपमुख्यमंत्री अजित पवार

.सात-बारा उताऱ्यावरील नाव नोंदणी, फेरफार प्रक्रिया झाली गतिमान- जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या नेतृत्त्‌वाखाली महसूल विभागाची विशेष मोहीम- अधिकार अभिलेखात नावनोंदणी होणार जलद- शेतकरी, सामान्य नागरिकांच्या पैसे व वेळेत बचत

vishwatmaklokswamivarta

माजी सैनिकांसाठी ‘आपदा मित्र’ प्रशिक्षण; 27 जानेवारीपर्यंत अर्ज मागविले

vishwatmaklokswamivarta

जालना जिल्ह्यातील पाच शिक्षकांची जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड

vishwatmaklokswamivarta

निम्न पेढी प्रकल्पातील स्थलांतराला वेग द्यावा- जिल्हाधिकारी आशिष येरेकर

vishwatmaklokswamivarta

मुंबई महापालिका निवडणुक प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज जाहीर-मुंबई महानगरपालिकेत दिसणार महिला राज, आरक्षण सोडतीत मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांपैकी 114 जागा महिलांसाठी राखीव…

vishwatmaklokswamivarta