vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ

राज्यस्तरीय सिनीयर नेटबॉल स्पर्धेकरीता निवड चाचणीचे आयोजन

राज्यस्तरीय सिनीयर नेटबॉल स्पर्धेकरीता निवड चाचणीचे आयोजन

जालना/प्रतिनीधी ः अ‍ॅम्युचर नेटबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व औरंगाबाद जिल्हा नेटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 28 ते 30 ऑक्टोंबर 2025 दरम्यान विभागीय क्रीडा संकुल, गारखेडा, छ. संभाजीनगर येथे आयोजीत 19 व्या राज्यस्तरीय सिनीयर नेटबॉल स्पर्धेत सहभागी होण्याकरीता दि. 18 ऑक्टोंबर 2025 शनिवार रोजी सकाळी 10 वाजल्यापासुन एस. व्ही. ईग्लीश स्कुल, पेंशनपुरा जालना येथे निवड चाचणीचे आयोजन करण्यात आलेले आहे.

सदर चाचणीत सहभागी होण्यासाठी जन्म तारखेची अट नाही, निवड चाचणीमधुन 12 मुले व 12 मुलींची निवड करण्यात येईल. निवड झालेले खेळाडु राज्यस्पर्धेत जालना जिल्हयाचे प्रतिनीधीत्व करतील.

निवड चाचणी व स्पर्धेच्या अधिक माहीती करीता जिल्हा संघटनेचे सचिव शेख चाँद पी.जे. मो.नं. 9822456366, उमेशचंद्र खंदारकर, सुभाष पारे, सुरेश त्रीभुवन, अमोल काटकर, संतोष वाघ, अमोल सोलाट, शेख महेजबीन, गिता संगम, शेख समीर, सोहेल खान यांच्याशी संपर्क साधावा.

तरी सदर निवड चाचणीचा जास्तीत तास्त खेळाडुंनी लाभ घ्यावा असे आवाहन जालना जिल्हा नेटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष बाला परदेसी, देवगिरी प्रतिष्ठाण चे अध्यक्ष बबन दादा सोरटी, जि.ई.एस. कॅम्पस चे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर पुंगळे पा., समन्वयक शेख अहेमद, क्रीडा अधिकारी श्रीमती लता लोंढे, श्रीमती आरती चिल्लारे, राज्य क्रीडा मार्गदर्शक सिद्धार्थ कदम, आशीष जोगदंड, तालुका क्रीडा संयोजक कृष्णा जंजाळ, प्रा. वाहेद पटेल, डॉ. शेख रफि क, प्रमोद राठोड, गुलाब राठोड, सचिन मोहीते व जिल्हा ऑलंम्पीक असोसिएशन, कला क्रीडा दूत फाऊंडेशन व जिल्हा नेटबॉल असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांंनी केले आहे

——————————–

संबंधित पोस्ट

खासगी क्रीडा अकादमींनी आर्थिक सहाय्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

धारावी विभागात भाजपा आणि चेंजर बॉईज कबड्डी टीम* यांच्या वतीने दोन दिवसीय *भव्य कबड्डी स्पर्धा* चे आयोजन

vishwatmaklokswamivarta

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन 2023-24 प्राथमिक छाननी गुणांकन प्रसिध्द करण्यासाठी सूचना व हरकती पाठविण्याचे आवाहन..

vishwatmaklokswamivarta

एकविध खेळ संघटनांनी कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

क्रीडापटूंसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करून द्या – मंत्री आदिती तटकरे

महसूल विभागाच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न

vishwatmaklokswamivarta