vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

 मोठी बातमी! राज्य सरकारला हायकोर्टाचा दणका, अकरावी प्रवेशासाठीची CET रद्द

 मोठी बातमी! राज्य सरकारला हायकोर्टाचा दणका, अकरावी प्रवेशासाठीची CET रद्द..

प्रतिनिधी : इयत्ता अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी परीक्षा हायकोर्टाकडून रद्द करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारला दणका बसला आहे. इयत्ता दहवीच्या गुणांच्या आधारावर मुलांना अकरावीसाठी प्रवेश द्या, असं उच्च न्यायालयानं सांगितलं आहे. सहा आठवड्यात प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेशही हायकोर्टाने दिले आहेत.

करोनाच्या काळात प्रत्यक्ष परीक्षा घेणे मुलांचा जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. त्यामुळेच न्यायालयाला याप्रकरणी हस्तक्षेप करावा लागला, असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

या सीईटीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना 2 ऑगस्टपर्यंतची मुदत दिली होती. आता सीईटी रद्द करण्याच्या आदेशाला स्थगिती देण्यासही न्यायालयाने नकार दिला आहे.

दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाद्वारे जाहीर केल्यानंतर राज्य शासनाच्या निर्णयानुसार अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेतली जाणार होती. ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा होणार होती तसंच 19 जुलैपासून सर्व मंडळांच्या विद्यार्थ्यांना त्यासाठी ऑनलाइन नोंदणी करता येणार होती.

संबंधित पोस्ट

ठाणे जिल्ह्यातील ५८ महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचेमा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते २० सप्टेंबर २०२४ रोजी ऑनलाईन उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा -1 अंतर्गत पुर्ण घरकुलांचे ई-गृहप्रवेश १७ सप्टेंबर लाटप्पा 2 अंतर्गत 14 हजार 951 घरकुलांना मंजुरी मंजुर लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित होणार 

vishwatmaklokswamivarta

धरमतर, बाणकोट खाडीपुलाला तात्काळ ना-हरकत प्रमाणपत्र द्यावे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

बिहार विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानाला सुरुवात…बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात सकाळी ९ वाजेपर्यंत १३.१३% मतदानाची नोंद झाली आहे.

vishwatmaklokswamivarta

बिटकॉइन घोटाळा- महाराष्ट्र सह देशभरात 6,800 कोटींप्रकरणी सीबीआयची देशभरात छापेमारी…

vishwatmaklokswamivarta

राहुल गांधी संविधानाचा अवमान करीत आहेत ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*