vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे सरळसेवेतील लिपिक टंकलेखक (गट-क) पदांची भरती

सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे सरळसेवेतील लिपिक टंकलेखक (गट-क) पदांची भरती

ठाणे, प्रतिनिधी:- सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील लिपिक टंकलेखक (गट क) एकूण 72 पदांकरीता फक्त माजी सैनिक उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. वरील पदांपैकी 01 पद हे अपंग संवर्गातून किमान 40% अपंगत्व असलेल्या उमेदवारामधून दिव्यांगत्वाच्या प्रकारांनुसार कर्तव्ये व जबाबदारीचा विचार करुन गुणवत्ता/उपलब्धतेनुसार भरण्यात येईल.

ही भरती प्रक्रिया टिसीएस-आयओएन यांच्यामार्फत होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. पात्र उमेदवारांना वेब-बेस्ड (Web-based) ऑनलाईन अर्ज www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर Recruitment Tab येथे दि.14 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून (Resources Tab -> दि.05 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी 23.59 वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक राहील. त्यानंतर ही वेबलिंक बंद होईल, असे ठाणे/पालघर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्रांजळ जाधव (निवृत्त) यांनी कळविले आहे.

 

0000

संबंधित पोस्ट

नवनिर्मित उप प्रादेशिक परिवहन कार्यालय मीरा-भाईंदर येथे-दुचाकी, चार चाकी, परिवहन व ऑटो या नवीन मालिका सुरू

डाक विभागाच्या आउटलेटसाठी प्रस्ताव मागविले

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे आज (दि.१९)पासून निर्जलीकरण प्रशिक्षण

vishwatmaklokswamivarta

कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांनी 15 मार्चपर्यंत नोंदणी करावी

vishwatmaklokswamivarta

खामगाव येथे 9 मार्च रोजी विशेष प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन

गणित, विज्ञानात विद्यार्थ्यांना पारंगत करणार आश्रमशाळांमध्ये शिक्षकांची २८२ पदे भरणार.

vishwatmaklokswamivarta