vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

तालिबान्यांनी अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर जागतिक महासत्तांना आवाहन…

तालिबान्यांनी अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर जागतिक महासत्तांना आवाहन…

विशेष प्रतिनिधी,अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी धुसखोरी करून देश ताब्यात घेतल्यानंतर मलाला युसूफझईने त्यावर चिंता व्यक्त करताना जागतित शक्तींना आवाहन केलं आहे.अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या प्रचंड हलकल्लोळाला अखेर पूर्णविराम मिळाला. अफगाणिस्तानमधील पूर्ण सत्ता आता तालिबान्यांच्या हाती आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी रविवारी संध्याकाळीच देश सोडून ताजिकिस्तानमध्ये गेले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संपूर्ण कोलाहलावर शांततेचं नोबेल पुरस्कार जिंकलेल्या मलाला युसूफझईने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्यासाठी ते सारं बघणं प्रचंड धक्कादायक होतं, असं म्हणतानाच मलाला युसूफझईनं एक विनंती केली आहे. आपल्या ट्विटर अकाउंटवरून ट्वीट करत मलालाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

 

…आणि अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात गेला!

अफगाणिस्तानमधून अमेरिकी फौजा माघारी परतल्यानंतर जे अपेक्षित होतं, तेच घडू लागल्याचं दिसू लागलं. तालिबाननं हळूहळू अफगाणिस्तानमधील एकेक प्रांत आपल्या ताब्यात घ्यायला सुरुवात केली. अखेर रविवारी तालिबानी बंडखोरांनी काबूलमध्ये शिरकाव करत अफगाणिस्तानच्या राजभवनावर आपला हक्क प्रस्थापित केला. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी देश सोडला आणि आख्खा देश तालिबान्यांच्या ताब्यात गेल्याचं स्पष्ट झालं. मात्र, हे पाहून तालिबान्यांच्या कट्टर भूमिकांचा विरोध करणारी सामाजिक कार्यकर्ती मलाला युसूफझई हिने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

मलाला म्हणते, “मला काळजी वाटते!”२४ वर्षांच्या मलाला युसूफझईने या सगळ्या प्रकारावर प्रचंड धक्क्यात असल्याचं ट्वीट केलं आहे. “तालिबान अफगानिस्तानवर ताबा मिळवत असल्याचं बघून आम्हाला प्रचंड धक्का बसला. मी तिथल्या महिला, अल्पसंख्य आणि मानवी अधिकार कार्यकर्त्यांविषयी खूप चिंतेत आहे. जागतिक, प्रादेशिक आणि स्थानिक सत्तांनी अफगाणिस्तानमध्ये तातडीने लक्ष घालून युद्धबंदी करावी. अफगाणिस्तानमध्ये मानवतेच्या दृष्टीकोनातून मदत करावी आणि नागरिकांना व निर्वासितांना संरक्षण द्यावं”, असं मलाला युसूफझईने ट्वीटमध्ये म्हटलं आह

 

संबंधित पोस्ट

*”मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेच्या लाभासाठी सुलभ अर्ज प्रक्रिया ..

भोंगा ही खरी समस्या नाही, RSS ला टॅग करत नितेश राणेंनी केली मोठी मागणी

सनातन संस्थेच्या वतीने दादर, कोपरखैरणे आणि ठाणे यांसह देशभरात ७७ ठिकाणी‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात संपन्न ! गुरूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी धर्माच्या बाजूने उभे रहा ! – सनातन संस्थेचे आवाहन

जिल्हास्तरीय N-CORD समितीची आढावा बैठक ठाण्यात 8.24 कोटींचा अंमली पदार्थांचा मोठा मुद्देमाल जप्त..

vishwatmaklokswamivarta

अभिभाषणावेळी मविआ आमदारांचा गोंधळ; राज्यपालांनी भाषण अर्ध्यावर सोडलं….

ऑपरेशन सिंदूर द्वारे भारतीय सैन्याने केलेली अतुलनीय कामगिरी अभिमानास्पद**देशाचे खंबीर नेतृत्व प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे अभिनंदन ~केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले* 

vishwatmaklokswamivarta